शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:37 AM

1 / 10
१९९० च्या सुरुवातीच्या काळात लालकृष्ण अडवाणी यांनी जेव्हा पदयात्रेचा प्रस्ताव दिला तेव्हा पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस प्रमोद महाजन यांनी त्यांना पदयात्रेऐवजी रथयात्रेचा सल्ला दिला.
2 / 10
त्यानंतर १२ सप्टेंबर, २०१९ रोजी, भाजपा सरचिटणीसांच्या बैठकीनंतर अडवाणी यांनी दिल्लीतील ११ अशोक रोड स्थित भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद बोलावली आणि १२ दिवसानंतर म्हणजेच २५ सप्टेंबरपासून गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशमधील अयोध्येपर्यंत रथ यात्रा (सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रा) काढण्याची घोषणा केली.
3 / 10
२५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणी सोमनाथला पोहचण्यापूर्वी एका ट्रकला भगव्या रंगाचा रथ बनण्यात आला होता. २५ सप्टेंबर रोजी अडवाणी यांनी सोमनाथ मंदिरात प्रार्थना केल्यानंतर यात्रा सुरू केली. ईदच्या सणामुळे त्यादिवशी सुट्टी होती. यानिमित्ताने गर्दी जमली की त्यांच्या घोषणा संपूर्ण वातावरणात गूंजू लागल्या.
4 / 10
महिलांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या देऊन त्यांना दान करण्यास सुरुवात केली. अडवाणींना तलवारी, काठ्या देऊन विविध वस्तू भेट देऊ लागले. रथ पुढे जाताना तेव्हा अडवाणींच्या बाजूला दोन व्यक्ती प्रखरतेने दिसले ते म्हणजे, एक प्रमोद महाजन आणि गुजरात भाजपाचे तत्कालीन संघटना सचिव नरेंद्र मोदी होते.
5 / 10
त्यानंतर जवळपास २९ वर्षे ११ महिन्यांनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून राम मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. २०२३ पर्यंत अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. साहजिकच पंतप्रधान त्याचे उद्घाटनही करतील. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिर उद्घाटनाचा भव्य समारंभ आयोजित केला जाऊ शकतो.
6 / 10
२००९ मध्ये मोदी अयोध्याशेजारील फैजाबादमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत अडवाणी हे भाजपाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. मोदींना मतदारांना आकर्षिक करण्यात यश आलं नाही आणि अयोध्या / फैजाबाद जागा कॉंग्रेसने जिंकली.
7 / 10
२०१ ४ च्या फैजाबादमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींच्या व्यासपीठावर प्रभू रामाची धनुष्य बाण घेतलेले विशाल चित्र उभे केले होते. मोदींनी आपल्या भाषणात रामराज्याविषयी बोलले, राम मंदिरावर काहीही बोलले नाही.
8 / 10
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा फैजाबादला पोहोचले. अयोध्येत त्यांनी एकही मेळावा घेतला नाही. अयोध्येत पंतप्रधान म्हणून त्यांची पहिली बैठक मे २०१९ मध्ये अयोध्या-आंबेडकर नगरपालिका हद्दीतील रामपूर माया या छोट्या गावात झाली. अयोध्यामधील रामजनभूमीपासून ते फारच दूर होते
9 / 10
आजपासून २९ वर्षापूर्वी राम मंदिर आंदोलनावेळी १९९१ मध्ये एका छायाचित्रकाराशी बोलताना मोदी म्हणाले होते की, ज्या दिवशी राम मंदिराचं निर्माण होईल तेव्हा मी पुन्हा येईन, १९९१ मधील मोदी आणि मुरली मनोहर जोशी यांचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो काढणारे छायाचित्रकार महेंद्र त्रिपाठी यांनी याचा खुलासा केला.
10 / 10
महेंद्र त्रिपाठी म्हणतात की, नरेंद्र मोदी भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत १९९१ मध्ये अयोध्येत आले होते. त्यांना वादग्रस्त जागेचा दौरा केला होता. ५ ऑगस्ट रोजी याच जागेवर मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे, त्यांनी दिलेलं वचन निभावलं असं ते म्हणाले.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी