शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Naina Kanwal: ग्लॅमरस महिला पोलीस, कुस्तीत जलवा, इन्स्टावर स्टार, आता झाली अटक, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 12:14 PM

1 / 7
हरियाणामधील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू, सोशल मीडिया स्टार आणि राजस्थान पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर नैना कैनवाल हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. फिल्मस्टारप्रमाणे स्टायलिश राहणाऱ्या नैना हिची गजाआड जाण्याची कहाणीही तितकीच फिल्मी आहे.
2 / 7
रोहतकमध्ये पोलीस नैना हिच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दरवाजा एसआय नैना कैनवाल हिने उघडला. नैनाच्या हातात पिस्तूल होती. पोलिसांना पाहून तिने पिस्तूल बाहेर फेकली.
3 / 7
पोलिसांनी पिस्तूल जप्त केली आणि नैनाला अटक केली. हरयाणा केसरी, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि राजस्थान पोलिसांमधील इन्स्पेक्टर नैना हिच्याविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 / 7
नैना सुताना जिल्ह्यातील पानीपत येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी अपहरणाच्या प्रकरणातील संशयित सुमित नांदल याचा शोध घेत असताना नैना हिच्या फ्लॅटवर धाड टाकली होती. पोलिसांना पाहताच नैनाने पिस्तूल प्लॅटच्या खिडकीतून बाहेर फेकली. पोलिसांना सुमित नांदल भेटला नाही. मात्र आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला.
5 / 7
नैनाने कुस्तीमध्येही आपल्या कौशल्याची छाप पाडली होती. तिने हरयाणा केसरीसह ६ आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.
6 / 7
शुक्रवारी एका अपहरण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरियाणा येथील रोहतक येथे छापे मारले होते. त्यावेळी राजस्थान पोलीस दलातील एसआय असलेल्या नैना हिला अवैध शस्त्रासह अटक केली. हरियाणा केसरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू आणि राजस्थान पोलीस दलातील पोलीस सब इन्स्पेक्टर नैना हिला आर्म्स अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली.
7 / 7
पोलीस सब इन्स्पेक्टर असलेली नैना ही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही दिसली होती.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानHaryanaहरयाणा