तुमची कॉलरट्यून शुक्रवारपासून बदलणार; बिग बींच्याऐवजी 'या' व्यक्तीचा आवाज ऐकू येणार

By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 08:07 PM2021-01-14T20:07:50+5:302021-01-14T20:10:16+5:30

सध्या कोणालाही मोबाईलवर कॉल केल्यानंतर एक डिफॉल्ट कॉलरट्यून ऐकू येते. त्यामुळे मोबाईलवर कॉल केल्यावर आपल्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो.

बिग बी अमिताभ बच्चन कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यायची काळजी कॉलरट्यूनच्या माध्यमातून सांगतात. मात्र शुक्रवारपासून अमिताभ यांचा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही.

शुक्रवारपासून तुम्ही कोणालाही कॉल केल्यावर कोरोना लसीकरणाची माहिती ऐकू येईल.

नवीन कॉलरट्यून हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. ही कॉलरट्यून जसलीन भल्ला यांच्या आवाजात असेल.

जसलीन भल्ला प्रख्यात व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी याआधी कोरोनाशी संबंधित कॉलरट्यूनला आवाज दिला आहे.

भल्ला गेल्या एका दशकापासून व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचा आवाज दिल्ली मेट्रो, स्पाईस जेट आणि इंडियाच्या विमानांमध्ये ऐकू येतो.

कोरोनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरुवातीला ऐकू येणाऱ्या कॉलरट्यूनमधील आवाज भल्ला यांचाच होता. 'कोरोना वायरस या कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है। मगर, याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं। उनसे भेदभाव न करें...।' अशी ही कॉलरट्यून होती.

व्हॉईस ओव्हर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या भल्ला यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनदेखील काम केलं आहे.