शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मायक्रो आर्टीस्टची कमाल, तांदळाच्या 4,042 कणांवर लिहिली 'भगवद् गीता'

By महेश गलांडे | Published: October 20, 2020 12:35 PM

1 / 12
भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय. प्राचीन भरतवर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे.
2 / 12
अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत. आपल्या प्राणसख्या असणा-या अर्जुनाला ते त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय.
3 / 12
मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते.
4 / 12
मानवी जीवन हे जेंव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो.
5 / 12
हिंदूंचा पवित्र ग्रंथ म्हणून या भगवद् गीता ग्रंथाचे पूजन केले जाते. विशेष म्हणजे न्यायालयातही हिंदू व्यक्तीच्या खटल्यात या ग्रंथावर हात ठेऊनच शपथ दिली जाते.
6 / 12
हैदराबादमधील लॉ कॉलेजच्या एका विद्यार्थीनीने चक्क तांदळाच्या कणांवर संपूर् भगवद् गीता लिहिली आहे. ही विद्यार्थींनी देशातील पहिली मायक्रो आर्टीस्ट असल्याचं दावा करण्यात येत आहे.
7 / 12
रामगिरी स्वरिका असं या राईस आर्टीस्ट विद्यार्थीनीचे नाव असून तांदळांच्या 4,042 कणांवर तिनेही ही गीता लिहिली आहे. त्यासाठी, तब्बल 150 तासांपेक्षा अधिकचा कालावधी तिला लागला.
8 / 12
मायक्रो आर्ट बनविण्यासाठी विविध संस्थासोबत आपण काम करत असल्याचं स्वरिकाने म्हटलंय. स्वरिकाला दुध कला, कागदावरील नक्षी आणि इतर उत्पादनांसह तिळांवरही सुक्ष्म रेखाटन तिने केलंय.
9 / 12
काही दिवसांपूर्वी स्वारिकाने केसांवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहली होती, त्यासाठी तेलंगणा सरकारने सन्मानित केले होते.
10 / 12
राष्ट्रीय स्तरावर आपली कलाकूसर दाखवल्यानंतर आता, आंतरराष्ट्रीय पातळीवर ही कला पोहोचविण्याचा मानस स्वरिकाने व्यक्त केला आहे.
11 / 12
2019 साली दिल्ली सांस्कृतिक अकॅडमीतून राष्ट्रीय पुरस्कारानेही स्वरिकाला सन्मानित करण्यात आलंय. तसेच, देशातील पहिली मायक्रो आर्टीस्ट म्हणून तिचौ गौरवही करण्यात आला.
12 / 12
भविष्यात वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, न्यायाधीश बनण्याची इच्छा असल्याचं स्वरिकाने म्हटलंय, मुलीसांठी प्रेरणादायी काम करण्याचंही तिचं उद्दिष्ट्य आहे.
टॅग्स :Telanganaतेलंगणाhyderabad-pcहैदराबादdelhiदिल्लीHinduहिंदू