उत्तर प्रदेशमध्ये लठामार होळीचा उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 21:30 IST2018-02-26T21:30:03+5:302018-02-26T21:30:03+5:30

उत्तर प्रदेशमध्ये सध्या लठामार होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
बरसान्याची होळी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही ओळखली जाते. बरसान्यात लठामार होळीनिमित्त मोठा जल्लोष केला जातो.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बरसान्याला भेट दिली. स्थानिकांमध्ये असलेल्या होळीचा उत्साह पाहिल्यानंतर मुख्यमंत्रीही आश्चर्यचकित झाले.
बरसान्यातल्या राधाराणी मंदिरामध्ये या होळीच्या निमित्तानं दिव्यांची आरास करण्यात येते.
देशभरातून अनेक भाविक होळीच्या काळात बरसान्याला आवर्जून भेट देतात आणि होळी साजरी करतात. होळीचा जल्लोष करत या दिवशी रंग आणि गुलालाची उधळण केली जाते.