मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं बनवले सॅनेटरी नॅपकिन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:27 IST2018-02-06T16:19:47+5:302018-02-06T16:27:09+5:30

मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर सोमवारी बायोडिग्रेडेबल सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी झाली होती.

कोलकाता येथे पार पडलेल्या हा उपक्रम ज्यूट इंडस्टी असोसिएशनकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानुषी छिल्लरने सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेतला होता.

उपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सॅनेटरी नॅपकिनच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतेची मुलभूत गरज पूर्ण करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.