शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makar Sankranti Special : काय पो छे! आकाशात रंगली पतंगबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 3:30 PM

1 / 8
नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो.
2 / 8
गुजरातमध्ये 'उत्तरायण' म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरी केली जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवली जाते.
3 / 8
पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सुंदर दिसले.
4 / 8
गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.
5 / 8
गुजरातमध्ये बरेच दिवस आधीच पतंगबाजी उत्सवाला सुरुवात होते. आकाशातील विविध आकाराचे आकर्षक पतंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
6 / 8
अमित शहा यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये आयोजित 'उत्तरायण' कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
7 / 8
अमित शहा यांना देखील पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी देखील पतंग उडवली.
8 / 8
गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. तसेच अनेकांच्या घरात जिलेबीची मेजवाणी असते.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीGujaratगुजरात