CoronaVirus Live Updates : 'या' राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिल्ली-मुंबईहून आलेले तब्बल 69 प्रवासी पॉझिटिव्ह, प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:27 AM2021-09-21T11:27:05+5:302021-09-21T11:46:50+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जवळपास दोन महिन्यांनी आता पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती जमा करण्यात येत असून त्यांची देखील चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच सर्व लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन करा असा महत्त्वाचा सल्ला देखील देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी (21 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 26,115 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 252 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,45,385 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,09,575 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,27,49,574 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

देशामध्ये एकूण 81,85,13,827 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. मात्र याच दरम्यान काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे.

बिहारमध्ये जवळपास दोन महिन्यांनी आता पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मधुबनी जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांत दिल्ली आणि मुंबईहून आलेले 65 हून अधिक प्रवाशांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

मधुबनीच्या सिविल सर्जने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत मधुबनी रेल्वे स्टेशनवर दिल्ली आणि मुंबईहून आलेल्या 69 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुनील कुमार झा यांनी पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाचं कोणतंच लक्षण आढळून आलं नसल्याचं म्हटलं आहे.

सर्व प्रवाशांना सध्या होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तपासणी करताना काळजी घेण्याचं देखील आवाहन सुनील कुमार झा यांनी केलं आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी नवी दिल्लीहून आलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि मुंबईहून आलेल्या पवन एक्स्प्रेसमधल जवळपास 35 प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचं टेस्टिंग आणि ट्रेसिंग केलं जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती जमा करण्यात येत असून त्यांची देखील चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच सर्व लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन करा असा महत्त्वाचा सल्ला देखील देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत.

काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे.

सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालून शकतो. जर लोकांनी सणसमारंभामध्ये कोरोना नियमावलीचं पालन केलं नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.