महासागरात बलाढ्य देशासमोर भारतीय नौदल दाखवणार ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:55 AM2019-04-03T07:55:30+5:302019-04-03T07:59:21+5:30

बंगालच्या समुद्रामध्ये 2 एप्रिलपासून 16 एप्रिलपर्यत ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशातील सर्वात मोठा हा नौदलाच्या जवानांचा सराव असणार आहे.

या सरावाला ऑसइनडेक्स असं नावं दिलं आहे. यामध्ये युद्ध परिस्थितीमध्ये जवानांनी कसं काम केलं पाहिजे याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एअरक्राफ्ट, युद्धनौका आणि पाणबुड्यांचा वापर या सरावादरम्यान करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये नौदलाचा सराव होणार आहे त्यात ऑस्ट्रेलियातील नौदलाचं सर्वात मोठं जहाज एचएमएएस कॅनबेरा याचाही समावेश असणार आहे. दोन्ही देशांमध्ये समसमान युद्ध नौकांचा समावेश करण्यात येणार आहे.

बॉईंगच्या पी 8 एअरक्राफ्टपासून पाणबुड्यांचा शोध आणि टार्गेट करण्याचा अभ्यास दोन्ही दलाचे नौदलाचे जवान करणार आहे. जवळपास 2 आठवडे चालणाऱ्या या सरावात भारत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे.

मागील काही वर्षापासून भारतीय नौदलने सबमरिन हंटिग कौशल्यावर विशेष करुन लक्ष दिलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाकडून 1 हजार नौदल जवान अभ्यासात सहभागी होणार आहे.