व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:37 IST2025-12-11T12:33:03+5:302025-12-11T12:37:04+5:30

DSP 'Kalpana Verma's Whatsapp chat: छत्तीसगडच्या DSP कल्पना वर्मा आणि व्यावसायिकाचे खासगी व्हॉट्सअॅप चॅट्स व्हायरल. लव्ह ट्रॅप, पैशांची मागणी आणि घटस्फोटाच्या बोलण्याने खळबळ. कोण आहेत ही युवा अधिकारी?

छत्तीसगड पोलीस दलातील लेडी डीएसपी कल्पना वर्मा आणि रायपूरमधील एका मोठ्या व्यावसायिकातील कथित 'लव्ह ट्रॅप' आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण लागले आहे, कारण डीएसपी आणि व्यावसायिकाचे अनेक व्हॉट्सअॅप चॅट स्क्रीनशॉट्स (WhatsApp Chat Screenshots) आणि खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपक आणि बरखा टंडन या व्यावसायीक दाम्पत्याने डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर सन २०२१ पासून मैत्रीच्या नावाखाली आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

त्यांच्या आरोपानुसार, डीएसपींनी व्यावसायिकाकडून प्रेमाच्या आणि संबंधांच्या नावाखाली २ कोटींहून अधिक रोख रक्कम आणि काही ऑनलाइन ट्रान्सफर घेतले. एक हिऱ्याची अंगठी, सोन्याची चेन आणि एक कारही घेण्यात आली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डीएसपींनी एका हॉटेलची मालमत्ता जबरदस्तीने त्यांच्या भावाच्या नावावर करून घेण्याचा दबाव टाकला. यात स्वतः डीएसपींनी ३० लाख रुपये गुंतवल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट्समधील काही संवाद या प्रकरणाला अधिक गंभीर आणि खासगी स्वरूप देत आहेत. यात 'मी येईन यार, Love U', '२४x७ तुमच्यासोबत आहे जी', 'घरातून शिव्या खाणार आज' आणि 'डिव्होर्स घेऊ का?' असे वैयक्तिक संदेश दिसत आहेत.

डीएसपी कल्पना वर्मा यांनी व्यावसायिकांचे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी करणारे असल्याचे सांगून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे, हे प्रकरण समोर आल्यानंतर डीएसपी वर्मा कोणाशीही संपर्क साधत नाहीत. त्यांचा फोन बंद असून, वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्यांच्याशी बोलू शकले नाहीत.

व्यावसायिकाने खमतराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर डीएसपींच्या भावानेही व्यावसायिकावरच खंडणी मागितल्याचा आणि राजकीय दबावातून षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी या दोन्ही तक्रारींची चौकशी सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणत्याही बाजूने एफआयआर (FIR) नोंदवण्यात आलेली नाही.