लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:18 PM2020-08-13T13:18:25+5:302020-08-13T13:29:10+5:30

चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत.

भारत आणि चीनमधील तणाव काही कमी होत नाहीय. लडाखमध्ये चीनच्या सैन्याने केलेली घुसखोरी कमी होत नसून चर्चाही निष्फळ ठरत आहेत. चीन मागे सराय़ला तयार नाहीय. पेगाँग लेक आणि देपसांग भागात चीनने घुसखोरी केलेली आहे. अशावेळी भारतीय सैन्याच्या मदतीला अमेरिकेने सर्वात घातक असलेली अण्वस्त्रधारी लढाऊ विमाने पाठविली आहेत.

अमेरिकेने ही अण्वस्त्रधारी लढाऊ विमाने भारतापासून अत्यंत जवळ असलेल्या नौसेनेच्या तळावर म्हणजेच डियागो गार्सियावर हे विमान तैनात केले आहे. अमेरिकेने चीनला साऊथ चायना सीमध्ये घेरलेले आहे. तरीही ही विमाने अमेरिकेच्या युद्धनौकांवर नाहीत.

अमेरिकन नौदलाच्या इंडो पॅसिफिक तुकडीकडून याची माहिती देण्य़ात आली आहे. अमेरिकेने तीन B-2 स्प्रिट स्‍टील्‍थ बॉम्‍बर विमाने डियागो गार्सियावर तैनात केले आहेत. या विमानांनी अमेरिकेच्या मिसौरी हवाईतळावरून 29 तासांचा प्रवास केला आहे.

अमेरिकेच्या या विमानांनी सलग 29 तास केलेला प्रवास हे दाखवितो की अमेरिका आपल्या मित्रांच्या मदतीसाठी कोणत्याही क्षणी आणि कितीही लांबून हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असे यामध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

चीनने लडाखच्या जवळ असलेल्या अड्ड्यावर DF-26 हे अण्वस्त्र मिसाईल तैनात केले आहे. चीनच्या या तयारीला जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारताच्या मदतीला ही लढाऊ विमाने पाठविली आहेत.

अमेरिकन हवाईदलाचे कमांडर कर्नल ख्रिस्तोफर कोनंत यांनी सांगितले की, आम्ही डियागो गार्सिया सारख्या महत्वपूर्ण जागेवर आलो आहोत. आम्ही हिंदी महासागरातील आमच्या मित्रांच्या मदतीसाठी तत्पर असून आमची हल्ला करण्याची क्षमता खूप तीव्र करत आहोत.

अमेरिकेचे हे विमान अणुबॉम्ब टाकण्यात सक्षम आहे. लढाऊ विमानांपेक्षा थोडे मोठे असले तरीही हे विमान प्रत्यक्ष युद्धातही सहभागी होण्याची ताकद ठेवते. लढाऊ विमानांची पुढील पीढी म्हणजे हे B-2 स्प्रिट स्‍टील्‍थ बॉम्‍बर आहे. अमेरिकेची ही विमाने जवळपास दीड वर्षांनी पुन्हा सक्रीय झाली आहेत. या द्वारे चीन आणि ईराणला मोठा इशारा अमेरिकेने दिला आहे.

अमेरिकेने ही अण्वस्त्रधारी विमाने अशावेळी तैनात केली आहेत, जेव्हा चीन-भारत, अमेरिका, तैवानसोबत युद्धखोरीच्या प्रयत्नात आहे. या विमानांबरोबरच अमेरिकेने हवाईदलाचे 200 कर्मचारीदेखील तैनात केले आहेत.

भारताचे राफेल विमान आल्यानंतर लगेचच चीनने एलएसीवर 36 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तसेच मिसाईल, अण्वस्त्रेही तैनात केली आहेत. चीनचा हे पाऊल पाहता चीन हल्ल्याच्या उद्देशाने ही तयारी करू लागला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी भारतीय नौसेनेसोबत युद्धसरावही केला होता. अंदमान निकोबार बेटांजवळ अमेरिकेने युद्धनौका पाठविली होती.

अमेरिकेचे हे B-2 स्प्रिट जगातील सर्वात विनाशकारी विमान आहे. हे विमान एकावेळी 16 B61-7 अणुबॉम्ब घेऊन जाऊ शकते. महत्वाचेम्हणजे हे विमान कोणत्याही रडारला चकवू शकते. अमेरिकेकडे अशी 20 बॉम्बर विमाने आहेत.

हे बॉम्बर 50000 फूट उंचीवर उड्डाण करतात. तसेच या उंचीवरून थेट 11000 किमीवरील लक्ष्यभेद करण्याची ताकद ठेवते. एकदा इंधन भरल्यास हे विमान 19 हजार किमी उडू शकते.

Read in English