महाराष्ट्राची कमतरता, राजपथावर चित्ररथांद्वारे संस्कृतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 04:27 PM2020-01-26T16:27:28+5:302020-01-26T16:50:09+5:30

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या चित्ररथांच्या प्रदर्शनात यावेळी महाराष्ट्राची उणीव जाणवली, राजस्थानच्या ऐतिहासिक शहरांचा दाखला देणारा चित्ररथ

तेलंगणातील वास्तूकला आणि मंदिरांच्या कलाकृतींचे दर्शन या चित्ररथामधून झाले

क्राफ्टमनशीप आणि संस्कृतीपर आधारित आसाम राज्याचा चित्ररथ लक्षणीय दिसत होता.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी हिमाचल प्रदेशचाही चित्ररथ पाहायला मिळाला. राज्यातील संस्कृतीचे दर्शन राजपथावर दिसून आले

गोवा ही पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते, त्यामुळेच समुद्रकिनारच्या पर्यटन संस्कृतीचे दर्शन गोव्याच्या चित्ररथात पाहायला मिळाले.

मध्य प्रदेशच्या चित्ररथानेही मध्य प्रदेशमधील संस्कृतीेच दर्शन देशवासियांना घडवले आहे.

उत्तर दक्षिण भागातील ओडिशा राज्याच्या चित्ररथानेही यावेळी प्रतिनिधित्व करत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले

उत्तर प्रदेशने सर्व धर्म समभावाचे दर्शन घडविणाऱ्या संस्कृतीच्या चित्ररथाचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं

कर्नाटक सरकारने बसवेश्वर महाराजांची कलाकृती सादर करत, पहिली सर्वधर्म समभावाची संसद चालविणारी थीम दर्शवली

जम्मू आणि काश्मीरने बॅक टू व्हिलेज अशी थीम राबवत काश्मीरमधील शांततेचा संदेश दिला आहे.