शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही दोस्ती तुटायची नाय! १३ वर्षीय मुलाची घोड्यावर बसून 'शाळा', अनोखी 'स्कूल बस' viral

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 7:40 PM

1 / 9
आजच्या सोशल मीडियाच्या जगात लहान मुलं आणि त्यांचं प्राणी प्रेम याच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मोबाईलचं जाळं लहानग्यांना निसर्गापासून लांब नेत असल्याचं दिसतं. पण, गुजरातमधील सूरत जिल्ह्यात एक अपवाद आढळून आला.
2 / 9
सूरत जिल्ह्यातील बारडोली इथं इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आणि घोड्याची दोस्ती चर्चेचा विषय ठरला आहे. हा लहानगा मागील चार वर्षांपासून घोड्यावर बसून शाळेत ये-जा करतो.
3 / 9
प्रामुख्यानं विद्यार्थी रिक्षा, व्हॅन किंवा सायकलवरून शाळेत येतात. पण इथं चित्र काहीसं वेगळं आहे. कारण बारडोली तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी दररोज घोड्यावर बसून शाळेत जातो.
4 / 9
घोड्याच्या साहाय्याने शाळा जिंकणाऱ्या कुश महेशभाई राठोडची परिसरात चर्चा रंगली आहे. कुश हा सध्या आठवीच्या वर्गात शिकत असून त्याचे वय १३ वर्षे आहे.
5 / 9
शेतकरी कुटुंबातील कुश यानं अनेकांचं लक्ष वेधलं. त्याचा घोडा देखील आता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.
6 / 9
हे प्रकरण सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खरवसा या छोट्याशा गावातील आहे. येथील कुश महेशभाई राठोड हा विद्यार्थी घोड्यावर स्वार होऊन शाळेत जातो.
7 / 9
वर्गात जाण्यापूर्वी तो शाळेबाहेर घोडा बांधतो आणि त्यासाठी चाराही ठेवतो. विशेषत: कार आणि इतर वाहनांनी येणारे शिक्षकही मुलाचं घोड्यावरील प्रेम पाहून भावूक होतात.
8 / 9
दरम्यान, कुश राठोड मागील चार वर्षांपासून घोड्यावर स्वार होऊन शाळा शिकत आहे. फावल्या वेळेत शाळेतील इतर विद्यार्थीही घोड्याला चारायला आणि त्याच्याशी खेळायला हजेरी लावतात.
9 / 9
विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कुश एकदा शेतात कामाला जात असताना त्याला एक पिल्लू दिसलं. त्यानं त्या पिल्लाला पाळलं आणि वाढवलं. नंतर तो त्याच्याशी इतका जोडला गेला की तो जिथं जातो तिथं त्याला घेऊन जातो.
टॅग्स :GujaratगुजरातStudentविद्यार्थीSchoolशाळा