आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 09:05 AM2020-05-14T09:05:19+5:302020-05-14T09:16:54+5:30

छत्तीसगडच्या आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्या आता ग्राऊंड वर्कपासून ट्विटरपर्यंत कोरोनाविरुद्ध जागरुकता निर्माण करण्याचं काम करत आहेत.

सोशल मीडियावर लोकांकडून प्रियंका शुक्ला यांचे कौतुक होत आहे. प्रियंका या आयएएस अधिकारी बनण्यापूर्वी एमबीबीएस डॉक्टर होत्या. डॉक्टर असताना त्यांच्यासोबत अशी घटना घडली ज्यामुळे त्यांनी आयएएस अधिकारी बनण्याचं निश्चय केला.

२००९ च्या कॅडरमधील आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला यांनी २००६ मध्ये लखनऊच्या प्रसिद्ध केजीएमयूमधून एमबीबीएसची पदवी मिळवली होती. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लखनऊ येथे काम सुरु केलं

कामादरम्यान त्या लखनऊच्या एका झोपडपट्टीत चेकअपसाठी पोहचल्या. तिथे एक महिला स्वत: आणि मुलाला खराब पाणी पाजत होत्या. प्रियंका यांनी त्या महिलेला रोखत तुम्ही हे पाणी का पिता? असा सवाल केला.

प्रियंका यांनी महिलेला रोखल्यानंतर त्या महिलेने प्रियंकाला सुनावलं की, तू कलेक्टर आहेस का? त्या महिलेचे उत्तर प्रियंका यांच्या मनाला लागलं.

त्या महिलेचं उत्तर ऐकून प्रियंका यांनी मनात निश्चय केला की आपण आयएएस बनणारच. त्यासाठी त्यांनी यूपीएएसीची तयारी सुरु केली. २००९ मध्ये प्रियंका शुक्ला यांना दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं.

प्रियंका शुक्ला या प्रतिभावंत अधिकारी आहेत. त्या कवितासुद्धा लिहितात तसेच नृत्यांमध्येही पारंगत आहेत. त्याचसोबत एक चांगली गायिका आणि चित्रकारही आहे. त्या आपल्या कलागुणांनी सोशल मीडियावर चाहत्यांना अनेक सुखद धक्के देतात

सोशल मीडियात त्यांना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते. फक्त ट्विटरवर त्यांचे ७० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांना फॉलो करणाऱ्यांमध्ये बॉलिवूडमधील कलाकारही आहेत.

प्रियंका शुक्ला यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या काळात २०११ मध्ये चांगल्या कामगिरीसाठी सैंसस सिल्वर मेडेलदेखील मिळालं आहे. त्याचसोबत साक्षरता अभियानासाठी चांगल काम केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळाला आहे.

प्रियंका शुक्ला यांनी कोरोनाच्या परिस्थितीत लोकांमध्ये जनजागरुकता करत अनेक प्रशासकीय कामगिरी उत्तमरित्या हाताळत आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक सर्वत्र होत आहे.

Read in English