मानलं भावा; 'तो' हिंदीला खूप घाबरायचा, पण हिंदी सिनेमे पाहूनच थेट IAS झाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:13 PM2020-01-28T13:13:43+5:302020-01-28T13:17:44+5:30

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा येथे जन्म झालेल्या अभिषेक शर्माची गोष्ट आयएएस बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. गावात गोपालन करणाऱ्या या मुलाने आयएएसमध्ये तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं आहे. मात्र त्याच्या या यशात बॉलीवूडच्या सिनेमांचा मोठा वाटा आहे असं वाटलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल नाही का? पण आम्ही तुम्हाला सांगतोय त्याच्या यशामागचं रहस्य

अभिषेकने सांगितल्याप्रमाणे गावाच्या मातीतल्या शाळेत जमिनीवर बसून त्याने शिक्षण घेतलं आहे. त्यावर शेणानं सारवलेलं असायचं. लहानपणापासून माझं स्वप्न होतं की, एक दिवस आयएएस बनायचं. तेव्हा आमच्या जिल्ह्यातही कोणी आयएएस झालं नव्हतं.

अभिषेकच्या मुलाखतीत तो सांगतो की, मी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्याची तयारी सुरु केली. शिक्षण घेऊन मी माझ्या गावातून दिल्लीला पहिल्यांदा आलो त्यावेळी मला कळालं की याठिकाणी स्पर्धेत खूप लोकं आहेत. येथील परिस्थिती खूप वेगळी होती.

तेव्हा जाणवलं होतं की, प्रत्यक्षात परीक्षा आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी हे किती कठीण असतं. एका वर्गात जवळपास ४५० विद्यार्थी बसायचे तेव्हा वाटलं की मी खरचं या परीक्षेच्या स्पर्धात्मक जीवनात टीकू शकेल का?

अभिषेकने पाहिलेलं स्वप्न ते त्याच्या एकट्याचं नव्हतं तर संपूर्ण कुटुंबाचं होतं. त्यामुळे मनात भीती होती की हे स्वप्न मी पूर्ण करु शकेन का? त्याचवर्षी मुख्य परीक्षेचा पेपर पाहिला तेव्हा मनात आलं की, जर मी या क्लासवर अवलंबून राहिलो तर कधी यश मिळवू शकतो. त्यामुळे सर्व सामान घेऊन तो परत गावाकडे परतला.

गावाकडे परतणं सोप्प नव्हतं. सर्वांना वाटलं की माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळावी यासाठी मी परत आलो होतो. जेव्हा गावात ४० दिवस वीज आली नाही तेव्हा मी घेतलेला निर्णय योग्य होता का? हा प्रश्न मी माझ्या मनाला सारखा विचारत होतो.

पहिल्या प्रयत्नावेळी अभिषेकच्या सर्व गावाला माहित पडलं की तो परीक्षा द्यायला निघालो आहे. सर्वात जास्त भीती मुलाखतीपासून होती. मी शिक्षण हिंदी माध्यमातून घेतलं होतं आणि मुलाखत इंग्रजी भाषेत होती. आंतरराष्ट्रीय शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांसोबत मी स्पर्धा कशी करणार? हे वाटलं.

या विचारानेच मी दोनवेळा परीक्षेत नापास झालो. मात्र तिसऱ्यांदा स्वत:मधला आत्मविश्वास जागवला. भीतीला सामोरं गेलो. यूट्यूबवरील बॉलीवूड कलाकार मनोज वाजपेयी यांची मुलाखत पाहिली. ते एनएसडीमध्ये प्रवेशाचं स्वप्न पूर्ण झालं नाही. मग त्यांना कशाप्रकारे यश मिळालं. त्याचवेळी सलमान खानचा सिनेमा सुल्तान आलेला त्यातून प्रेरणा मिळाली. तसेच सन्नाटा सिनेमातील एक सीन आहे. ज्यात स्वरा तिच्या मुलाला सांगते. जर तुझ्यासमोर कोणतं स्वप्न आहे तर नक्कीच कठिण प्रसंग येणार आहे. त्याला ध्येय बनवा.

त्याशिवाय स्वराने संदेश दिला की, काही लोक तुमच्या मदतीला येतील त्यांना जवळ घ्या, काही लोक तुमची निंदा करतील त्यांना सोडून द्या. तिसऱ्यावेळी मी रिलॅक्स मूडमध्ये मेन्स परीक्षा दिली आणि पास झालो, त्यानंतर मी इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी वृत्तापत्रात वाचून मला शिकता आलं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात मी ऑल इंडिया रॅँकिंगमध्ये यश पटकावलं.