दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या तिनं गोंडस परीला दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 14:00 IST2018-02-12T13:53:52+5:302018-02-12T14:00:22+5:30

जम्मूतील सुंजवां लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात रायफलमन नाझिर अहमद खान आणि त्यांची पत्नी शाहजदा खान जखमी झाले. गर्भवती असलेल्या शाहजदा खान यांना हल्ल्यात पाठीत गोळी लागली होती. याच दरम्यान त्यांना प्रसूतीकळाही सुरू झाल्या.

लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडत शाहजदा यांची प्रसूती केली.

महिलेच्या पाठीतील गोळी काढतानाच बाळालाही जन्म देण्याचे आव्हान होते, असे डॉक्टरांनी सांगितले. अखेर दोन आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडल्या व शाहजदा यांनी एका गोंडस परीला जन्म दिला. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.