INS Tushil: भारतासाठी युद्ध विसरून रशिया-युक्रेन एकत्र आलं; अमेरिका-चीनची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:57 IST2024-12-10T12:52:38+5:302024-12-10T12:57:17+5:30

भारत आणि रशिया यांची मैत्री खूप जुनी आहे. संकटाच्या काळात अनेकदा रशियाने भारताला मदत केली आहे. आता या दोस्तीत आणखी नवी भागीदारी समोर आली आहे. त्यात यूक्रेनही सहभागी झाला आहे. या तिन्ही देशांच्या त्रिकोणीय पार्टनरशिपने अमेरिका आणि चीन दोघेही हैराण झाले आहेत कारण रशिया आणि यूक्रेन यांच्यात २ वर्षापासून युद्ध सुरू आहे.
अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यानंतर रशियाने भारताला आणखी एक युद्धनौका आयएनएस तुशिल सोपवली आहे. भारतासाठी ही महत्त्वाची घटना आहे कारण रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धावेळी ही युद्धनौका भारताला मिळाली आहे. INS Tushil ही आधुनिक युद्धनौका आहे.
ही युद्धनौका रशियाने भारतासाठी डिझाइन आणि तयार केली आहे. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे प्राथमिक इंजिन, गॅस टर्बाइन, युक्रेनमध्ये तयार केले जातात. भारताला युक्रेनियन इंजिनांसह रशियन युद्धनौका मिळत आहे. या युद्धनौकांमध्ये वापरलेली प्राथमिक इंजिने युक्रेनमध्ये बनवली आहेत. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील बहुतेक जहाजे गॅस टर्बाइन इंजिन वापरतात, जी युक्रेनियन कंपनी Zorya-Mashproekt द्वारे उत्पादित केली जातात. सागरी गॅस टर्बाइनच्या उत्पादनात ही कंपनी जगातील अव्वल कंपनीमध्ये गणली जाते.
भारताच्या राजकीय कूटनीतीचं हे उत्तम उदाहरण आहे. या कठीण परिस्थितीतही भारताने रशिया आणि युक्रेनशी सकारात्मक संबंध ठेवले आहेत. सध्या दोन्ही देश एकमेकांविरुद्ध युद्धात अडकले आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत भारताने दोन्ही देशांकडून लष्करी उपकरणे खरेदी केली आहेत. त्यामुळे भारताची लष्करी क्षमता वाढवण्यात मदत झाली आहे. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे संबंध दृढ झाले आहेत.
ही भागीदारी भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. भारत, रशिया आणि युक्रेन या तिन्ही देशांचे हिंद महासागर क्षेत्रात महत्त्वाचे धोरणात्मक हितसंबंध आहेत. चीन या भागात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत भारत, रशिया आणि युक्रेन यांच्यातील ही भागीदारी एक समतोल शक्ती म्हणून पुढे येऊ शकते. भारताने या युद्धनौकेची ऑर्डर दिली होती तेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले होते. युद्धामुळे आयएनएस तुशील पूर्ण करण्याचे आव्हानही मोठे होते. भारताला युक्रेनकडून ही इंजिने खरेदी करून ती युद्धनौकेवर बसवण्यासाठी रशियाला द्यायची होती. त्यामुळे काहीसा विलंब झाला.
आयएनएस तुशीलच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर यंत्रणांनी सुसज्ज आहे. तुशील हे मिसाईल फ्रिगेट आहे. म्हणजेच त्यात ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवली आहेत. हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे. जी रशिया आणि भारताने मिळून बनवली आहे.
या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला चालना मिळेल. INS तुशील युद्धनौकेत या क्षेपणास्त्राच्या तैनातीमुळे शत्रूचा थरकाप उडेल. या युद्धनौकेतील शस्त्रे अत्यंत संतुलित आहेत. त्यात स्टेल्थ तंत्रज्ञान आहे. शत्रूच्या रडारवर ते सहजासहजी दिसणार नाही. त्याची रचना अशी आहे की, ती लो रडार विजिबिलिटी फॉलो करते. एवढेच नाही तर गरज भासल्यास हे जहाज ऑटोमेटिकली चालू शकते.
भारताला हवं असतं तर अमेरिका, फ्रान्स, इस्रायल किंवा इतर कोणत्याही देशाकडून युद्धनौका तयार करता आल्या असत्या. मात्र रशियाशिवाय कोणत्याही देशाला आपले तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करायचे नव्हते. त्यामुळे भारताने रशियाची निवड केली. रशियाने आपल्या जुन्या मित्राला प्रगत लष्करी तंत्रज्ञानही दिले.
रशियाकडे जगातील सर्वात प्रगत जहाजबांधणी तंत्रज्ञान आहे हे भारताला माहीत आहे. भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत रशियाही मदत करण्यास तयार आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र त्याचाच एक भाग आहे. याशिवाय असॉल्ट रायफल, टँक अशी अनेक शस्त्रेही अशाच पद्धतीने बनवली जात आहेत.
१८ अधिकाऱ्यांसह १८० सैनिकांना घेऊन ही युद्धनौका ३० दिवस समुद्रात तैनात राहू शकते. त्यानंतर इतर गोष्टी आणि इंधन त्यात भरावे लागते. ही युद्धनौका इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज आहेत. तसेच, 4 KT-216 decoy लाँचर स्थापित केले आहेत. त्यात 24 Shtil-1 मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे तैनात आहेत.