रेल्वेने तयार केलं कोचचं नवीन आकर्षक डिझाइन, प्रवास होईल आणखी आरामदायक आणि रिफ्रेशिंग; बघा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:37 IST2026-04-06T14:21:56+5:302026-04-06T15:37:37+5:30

Railway Coach News Design Model : आराम, सुंदरता आणि चांगल्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने कोचचं नवीन इंटेरिअर डिझाइन करण्यात आलंय. सोबतच आतील रंगही वेगळा केला आहे.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायक आणि चांगला करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. रेल्वेमध्ये अनेक नवीन बदल केले जातात. आता रेल्वेने प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून कोचचं नवीन डिझाइन आणि चांगल्या टॉयलेटचं मॉडल तयार केलं आहे. यासाठी एक सॅम्पल कोच तयार केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी हल्लीच या डिझाइन कोचची पाहणी केली. (Image Credit : Indian Railway)

आराम, सुंदरता आणि चांगल्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने कोचचं नवीन इंटेरिअर डिझाइन करण्यात आलंय. सोबतच आतील रंगही वेगळा केला आहे.

या कोचमध्ये वेगवेगळे इंटेरिअर कलर थीम वापरण्यात आले आहेत. ज्यात PVC फ्लोरिंग, सीट आणि बर्थची रेक्सिन, स्नॅक्स टेबल, पडदे आणि टॉयलेट सारख्या ठिकाणी मिळते - जुळते रंग वापरण्यात आले आहेत. तसेच या कोचचा डिझाइन सुरक्षेच्या दृष्टीनेही चांगलं करण्यात आलंय.

भारतीय रेल्वेचं हे पाउल आपल्या रोलिंग स्टॉक रेल्वेचं आधुनिकीकरण, रेल्वेच्या आतील वातावरण चांगलं करण्यास उचलण्यात आलं आहे. सगळ्याच वर्गातील प्रवाशांना एक सुरक्षित, आरामदायक अनुभव देण्यासाठी हा बदल करण्यात येईल.

कोचच्या नव्या डिझाइनमध्ये इंटेरिअरला ग्रे थीम देण्यात आली आहे. ज्यात फ्लोरला लाइट ग्रे आणि सीटला डार्क ग्रे कलर देण्यात आलाय. त्याशिवाय एसी कोचमधील पडद्यांचा रंगही बदलून ग्रे करण्यात आलाय. सध्या रेल्वेत निळ्या रंगाचे पडदे लावले जातात.

सेकंड एसी कोचमध्ये प्रवाशांना स्नॅक टेबलची सुविधा मिळेल. ज्यामुळे त्यांना जेवण करण्यास मदत मिळेल.

अनेक वर्षांपासून तेच तेच कोच डिझाइनपासून लोकांना जरा वेगळा फिल मिळेल असं यावरून दिसतं. इंटेरिअल बरंच आकर्षक आणि डोळ्यांना देखील आराम देणारं वाटतं.