शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:19 IST

1 / 10
India Pakistan conflict : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई केली. 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तासहव पीओके मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांतील सीमेवर तणाव निर्माण झाला. पाकिस्तानने सर्वच सीमांवर गोळीबार केला.
2 / 10
भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तणाव सुरू होता. दोन्ही देशांच्या सीमेवर गोळीबार सुरू होता. यादरम्यान, पाकिस्तानने तुर्कीयेने पुरवलेल्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
3 / 10
'आज तक'वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एकूण ३५० हून अधिक तुर्की ड्रोनचा वापर करण्यात आला. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले तुर्की लष्करी कर्मचारी भारताविरुद्ध ड्रोन हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.
4 / 10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर, तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर ड्रोन हल्ले करण्यात मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन तुर्की ड्रोन ऑपरेटर देखील मारले गेल्याचे माहिती समोर आली आहे.
5 / 10
पाकिस्तानने भारताविरुद्ध TB2 ड्रोन आणि YIHA ड्रोन वापरले आहेत. या ड्रोनचा वापर लक्ष्य ओळखण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी केला जातो.
6 / 10
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू आणि १७ हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी होता, त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली. यामध्ये १९६० चा 'सिंधू जल' करार रद्द करण्यात आला.
7 / 10
यानंतर भारताने ७ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, या हल्ल्यामध्ये १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली.
8 / 10
यानंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबार सुरू केला. पाकिस्तानने भारतीय लष्कर आणि निवासी ठिकाणांना लक्ष्य केले, यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला.
9 / 10
दोन्ही देशांतील तणाव चार दिवस सुरू होता. यामध्ये तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांची प्राथमिक तपासणी केली. यामध्ये हे ड्रोन तुर्की-मूळच्या सोंगर सशस्त्र ड्रोन प्रणालीचे असल्याचे समोर आले आहे.
10 / 10
विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, सियाचीनपासून सर क्रीकपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ३६ ठिकाणी सुमारे ३००-४०० ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतIndian Armyभारतीय जवान