शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पतीसह फिरताना दिसल्या IAS टीना डाबी, शेअर केले रोमँटिक Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:05 IST

1 / 7
काही दिवसांपूर्वी IAS टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी नुकतंच प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता त्यांनी सोशल मीडियावर आपले पती प्रदीप गावंडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हे आयएएस जोडपे गोव्यात एन्जॉय करताना दिसत आहे.
2 / 7
आयएएस टीना डाबी आणि आयएएस प्रदीप गवांडे यांचा विवाह नजीकच्याच १५-२० लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. त्यांनी आपल्या लग्नाचा एका फोटोही शेअर केला होता.
3 / 7
टीना डाबी यांनी सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा अल्बमही शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांनी गोव्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंच्या स्टेटसवर काही फोटो शेअर केले आहेत.
4 / 7
टीना डाबी यांनी गोव्यात असतानाचा आपले पती प्रदीप गावंडे यांचा फोटो शेअर केला आहे. तसंच त्यांनी यासोबत लव ऑफ माय लाईफ असंही लिहिलं आहे.
5 / 7
प्रदीप गवांडे हे राजस्थान पुरातत्व विभागाचे डायरेक्टर आहेत. तर टीना डाबी राजस्थान सरकारमध्ये संयुक्त सचिव वित्त (कर) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी २० एप्रिल रोजी विवाह केला होता.
6 / 7
लग्नापूर्वी टीना डाबी यांनी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता सध्या त्या सोशल मीडियावर पुन्हा अॅक्टिव्ह झाल्या आहेत.
7 / 7
टीना यांनी प्रदीपसोबतच्या प्रेमाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची भेट कोरोनाच्या काळात झाली आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यावेळी दोघेही राजस्थानच्या आरोग्य विभागात एकत्र काम करत होते. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.
टॅग्स :marriageलग्नgoaगोवा