पतीने केलेल्या अपमानाचा शिकवला धडा, पत्नीने मॅट्रिमोनिअल साइटवर दिली स्वत:च्या लग्नाची जाहिरात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 02:19 PM2021-02-10T14:19:50+5:302021-02-10T14:32:15+5:30

पती-पत्नीच्या भांडणात पती म्हणाला की, 'धन्यवाद दे की मी तुझ्यासोबत लग्न केलं, नाही तर तुझं लग्न झालं नसतं'.

पती-पत्नीमध्ये वाद होणं ही एक सामान्य बाब आहे. पण भोपाळच्या फॅमिली कोर्टात एक वेगळीच केस समोर आली आहे. याआधी तुम्ही कधीही अशी केस ऐकली नसेल.

पती-पत्नीच्या भांडणात पती म्हणाला की, 'धन्यवाद दे की मी तुझ्यासोबत लग्न केलं, नाही तर तुझं लग्न झालं नसतं'.

बस ही गोष्ट पत्नीच्या मनाला इतकी लागली की, तिने माहेरी जाऊन मॅट्रिमोनिअल साइटवर लग्नासाठी स्वत:चं प्रोफाइल तयार केलं आणि त्यात लिहिलं की, घटस्फोटाची वाट बघतीये.

मॅट्रिमोनिअल साइटवर पत्नीच्या प्रोफाइलची माहिती पतीला मिळाली तर तो दोन्ही मुलांची कस्टडीसाठी आणि पत्नीला घटस्फोटासाठी अर्ज करून आला.

दोघांचं लग्न २००८ मध्ये झालं होतं. त्यांना दोन मुलेही आहेत. पत्नीने सांगितले की, पती नेहमीच टोमणे मारत होता की, मी तुझ्याशी लग्न केलं. दुसरं कुणी केलं नसतं.

आधीच एकट्यात असं म्हणणं ठीक होतं. पण पतीने सार्वजनिकपणे सर्वांसमोर तिचा अपमान केला. त्यामुळे तिने माहेरी येऊन हा कारनामा केला. असं करण्याचं कारण म्हणजे हे जाणून घ्यायला की, कुणी तिच्याशी लग्न करतं की नाही.

पत्नीच्या या आरोपावर पती म्हणाला की, तो बंगालचा राहणारा आहे. तिथे संयुक्त परिवार आहे. पत्नी नेहमीच त्याच्यावर परिवाराापासून वेगळं राहण्याचा दबाव टाकत होती.

ती मुलांना घेऊन नेहमीच माहेरी जात होती. यावेळीही तसंच झालं होतं. असं वाटलं की, नेहमीसारखी परत येईल. पण ती इथपर्यंत मजल मारेल याची कल्पना नव्हती.

मित्रांसोबतच परिवारातील लोकांनीही तिची ही जाहिरात पाहिली आहे. याने परिवाराच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर फॅमिली कोर्टात काउन्सेलर म्हणाले की, पत्नीने जे पाउल उचललं जे योग्य नाही. आता मुलांचं भविष्य बघून काउन्सेलिंग केलं जात आहे. आशा करूया की, पती-पत्नीतील हे वाद संपतील.