पंतप्रधान मोदींच्या सिक्योरिटी इंचार्जला किती सॅलरी मिळते? जाणून घ्या, संपूर्ण पॅकेज अन् इतर लाभांसंदर्भात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 09:21 IST2025-04-04T09:09:43+5:302025-04-04T09:21:09+5:30

एसपीजीचे जवान अगदी सावलीप्रमाणे पंतप्रधानांसोबत असतात. पंतप्रधानांचा दौरा जेथे कुठे असेल, तेथे हे जवान त्यांच्यासोबतच असतात...

भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही विशेष सुरक्षा गटाकडे अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे (SPG) असते. एसपीजीचे जवान अगदी सावलीप्रमाणे पंतप्रधानांसोबत असतात. पंतप्रधानांचा दौरा जेथे कुठे असेल, तेथे हे जवान त्यांच्यासोबतच असतात. तर जाणून घेऊयात या जवानांच्या सॅलरी संदर्भात...

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना त्यांचे पद, अनुभव आणि सेवेनुसार वेगेवगळी सॅलरी असू शकते. SPG सुरक्षा अधिकाऱ्यांची वार्षिक सॅलरी त्याचे पद आणि अनुभवानुसार, 8 लाख रुपये ते 12 लाख रुपयांदरम्यान असते.

...मात्र, एसपीजीच्या उच्च पदांवरील अधिकाऱ्यांना, जसे की, एसपीजी सुरक्षा इंचार्ज यांची सॅलरी किती असते? हे सार्वजनिक दृष्ट्या समोर आणली जात नाही. कारण त्यांची सॅलरी गोपनीयतेच्या कक्षेत येते.

SPG कमांडो अधिकाऱ्यांना किती मिळते सॅलरी? - पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या कमांडोंची सॅलरी ही त्यांच्या अनुभवानुसार वाढते. माध्यमांतील वृत्तांनुसार, एसपीजी कमांडोची मासिक सॅलरी 84236 ते 239457 रुपयांदरम्यान असते. ही सॅलरी त्यांच्या पद आणि अनुभवानुसार ठरते.

याशिवाय, एसपीजी कमांडोंना सर्व भत्ते सरकारकडून दिले जातात. त्यांच्या वार्षिक सॅलरीचा विचार करता, 11 ते 20 वर्षांचा अनुभव असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांची वार्षिक सॅलरी 8 लाख ते 18 लाखांदरम्यान असू सकते.

याशिवाय, एसपीजी सुरक्षा अधिकाऱ्यांना विशेष भत्ते, जोखीम भत्ता, तसेच इतर लाभही मिळतात. त्यांना ड्रेस अलाऊन्स देखील दिला जातो. ऑपरेशन ड्यूटीवर तैनात असणाऱ्यांना कमांडोंना वर्षाला 27800 तर नॉन ऑपरेशनल ड्युटीवरील कमांडोंना वर्षाला 21225 रुपये मिळतात,

याशिवाय, सुरक्षा इंचार्ज म्हणून एक वेगळे पद असते. या पदावरील अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन एसपीजी कमांडोना करावे लागते. या अधिकाऱ्यांची सॅलरी सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र, एसपीजी कमांडोंच्या पगारावरून, त्यांच्या मासिक सॅलरीचा अंदाज येऊ शकतो.

या पदावरील अधिकाऱ्यांची सॅलरीही त्यांचा अनुभव आणि पदानुसार निश्चित होते. खरे तर, एसपीजी कमांडो होण्यासाठी सरकारने काही नियम ठरवले आहेत. ज्यांचा स्वीकार करणे आणि ते पूर्णपणे पाळणे अनेकांना शक्य होत नाही.