कोरोनाशी संबंधित 'ही' 10 तथ्ये अन् अफवा माहिती आहेत काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:55 IST2020-04-24T22:24:32+5:302020-04-24T22:55:46+5:30

कोरोनाच्या प्रादुर्भावानं जगभरात २६ लाखांहून जास्त लोक संक्रमित झाले आहेत. त्यातील जवळपास दोन लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे.
चीनच्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या कोरोनात न्युमोनियासारखी लक्षणं आढळून येतात. त्यासंदर्भात अनेक अफवासुद्धा आहेत. त्याची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत...
कोरोना हा विषाणू घरातील पाळीव प्राण्यांमध्ये पसरू शकतो का?
पाळीव कुत्री, मांजरी आणि प्राणिसंग्रहालयात वाघ देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. परंतु असे असतानाही पाळीव प्राण्यांपासून मनुष्याला कोरोनाचं संक्रमण होत असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. तरीसुद्धा प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर हात नेहमी साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत.
कोरोना विषाणूचा परिणाम वृद्ध लोकांबरोबर तरुणांवर देखील होतो?
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व वयोगटातील लोकांमध्ये होतो. वृद्ध लोक किंवा ज्यांना आधीच दमा, मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांना या व्हायरसने आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. जागतिक आरोग्य संघटनेनं सर्व वयोगटातील लोकांना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले आहे.
कोरोना व्हायरसला रोखण्यास आणि उपचार करण्यात प्रतिजैविक फायदेशीर आहेत काय?
कोरोनो विषाणूला रोखण्यास किंवा उपचार करण्यासाठी एक साधन म्हणून प्रतिजैविकांचा वापर प्रभावी ठरत नाही. कोरोना व्हायरसमुळे आपल्याला रुग्णालयात दाखल केले जाणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला प्रतिजैविक दिले जाऊ शकतात, जे आपल्याला आराम देतात, कारण जीवाणू इतर आजारांना देखील कारणीभूत ठरू शकतो.
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कोणतीही विशिष्ट औषधे उपलब्ध आहेत का?
सध्या कोरोना विषाणूला रोखणारं कोणतेही औषध नाही. सध्या जगातील सर्व वैज्ञानिक त्यावर लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत. या विषाणूची लागण झालेल्या लोकांनी लक्षणांविषयी जागरूक राहावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
एन 95चे मास्क घालणे किती महत्त्वाचे आहे?
कोरोना विषाणूच्या वेगाने होणार्या संसर्गामुळे भारत सरकारने प्रत्येकाला मास्क घालण्याची सक्ती केली आहे. पण प्रत्येकाकडे एन 95 मास्क असणं आवश्यक नाही. एन 95 मास्क हे वैद्यकीय कर्मचा-यांसाठी आणि कोरोना रुग्णाची काळजी घेत असलेल्या नर्स आणि डॉक्टरांनी वापरणं गरजेचं आहे.
लोकांनी किती अंतर घ्यावे?
कोरोना विषाणूच्या संसर्गाची मर्यादा 2 मीटर आहे, जर आपण एखाद्याला दोन मीटर अंतर राखून भेटत असल्यास घाबरण्याची गरज नाही.
अल्कोहोलमुळे कोरोना विषाणू मरतो?
अल्कोहोलमुळे कोरोना विषाणू मरत असल्याची माहिती पूर्णपणे निराधार आहेत. केवळ आणि केवळ सॅनिटायझरचा उपयोग करणे फायदेशीर आहे.
मांसाहार करणं सुरक्षित आहे का?
मांसाहारी खाल्ल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही, परंतु अशी अफवा पसरविली जात आहे की मांसाहार केल्यानं संक्रमणाचा धोका वाढतो. पण मांस चांगले शिजलेले असले पाहिजे आणि कच्चे राहता कामा नये. कच्चे मांस खाल्ल्याने संक्रमण होत असल्याचं डॉक्टर सांगतात. इतर कोणताही संसर्ग टाळण्यासाठी मांसाहारपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे.
तापमानाशी काहीही संबंध नाही
सिंगापूरसारख्या गरम देशातही कोरोना पसरला आहे. तसेच इटली आणि दक्षिण कोरियासारख्या थंड देशांमध्येही हा विषाणू पसरत आहे. हिवाळ्यात हा विषाणू जास्त काळ टिकू शकतो, परंतु जर आपण संसर्ग रोखण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले तर आपण सुरक्षित राहू शकतो.
कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध आहे काय?
कोरोना विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा औषध मिळालेले नाही, कारण तो एक नवीन व्हायरस आहे. सोशल मीडियामुळे या आजाराबद्दल अधिक भीती पसरली आहे.
डॉ. गुलेरिया यांच्या मते, कोरोना विषाणूचा मृत्यूदर फक्त 2 ते 3% आहे, म्हणजेच 98% लोक बरे होतील.
९२ अंश डिग्री सेल्सियस तापमानात या विषाणूचा नायनाट होत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.