गुजरात : कांडला बंदराजवळ तेलाने भरलेल्या जहाजाला आग, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 14:38 IST2018-01-18T14:34:00+5:302018-01-18T14:38:05+5:30

गुजरात किनारपट्टीनजीक बुधवारी (17 जानेवारी) मर्चंट नेव्हीच्या एका तेलवाहक जहाजाला आग लागली.
या जहाजात तब्बल 30 हजार टन हाय-स्पीड डिझेल असल्याचे सांगण्यात येते आहे.
'एएनआय'च्या वृत्तानुसार जहाजाच्या परिसरातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये मात्र तेल आढळून आलेले नाही.
बुधवारी (17 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या जहाजाला आग लागल्याची माहिती समोर आली.
भारतीय तटरक्षक दलाने तत्परता दाखवत जहाजाच्या चालकासह सर्व 26 क्रू मेंबर्सना वाचवले. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.