शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold-Silver Rate: सोन्याचा भाव पुन्हा २२० रुपयांनी वधारला; चांदीची किंमतही वाढली, जाणून घ्या, आजचा नेमका दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 2:43 PM

1 / 5
लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.
2 / 5
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५०,६७० रूपयांवर व्यवहार करत आहेत. आज सोन्याच्या किंमतीत कालच्या दिवसाच्या तुलनेत २२० रुपयांची वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,४५० रुपये इतके आहे.
3 / 5
तर १ किलो चांदीचा दर ५९,४०० रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा दर काल ५८,७०० इतके होता. म्हणजे आज ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी