शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

काहीच कळेना! सोन्या चांदीचे नवे दागिने घ्यायचे की आहे ते विकायचे? तसेच ठेवले तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:07 IST

1 / 9
भारतात सोन्यासाठीची ओढ काही कमी नाहीय. आज सोन्याचे दर दीड लाखांवर गेले आहेत. आज मुंबई, पुण्यात २४ कॅरेटच्या सोन्याचा दर १,६२,४७५ रुपये आहे. आज ज्यांच्या घरात सोने, सोन्याचे दागिने आहेत ते तर बसल्या जागेवरच लखपती, करोडपती झाले आहेत.
2 / 9
अनेकांच्या गरजा असतात म्हणून हे सोने गहाण ठेवले जाते किंवा विकले जाते. अनेकांना सोन्याचे दर कमी जास्त होत असल्याने वेगळ्याच उद्योगाची कल्पना सुचू लागली आहे. हे दागिने, सोने विकायचे की ठेवायचे, की विकून सोन्याचे दर घसरले की त्या पैशांतून नवे घ्यायचे आणि फायदा कमवायचा, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
3 / 9
शेअर बाजारात सगळीकडे खळबळ असताना, आंतरराष्ट्रीय राजकारण- वातावरण बिघडलेले असताना लोक सोन्याकडे वळतात आणि पैसे गुंतवतात. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरात एकाएकी वाढ होण्यामागे हेच कारण आहे. आताही ट्रम्प यांनी अशीच परिस्थिती निर्माण केल्याने सोन्या, चांदीच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत.
4 / 9
आपल्याकडे लग्नासाठी, लहान मुलांसाठी तसेच तरुण वयात आलेल्या मुलींसाठी दागिने केले जातात. अनेकदा आधीचे सोने मोडून त्यातच थोडी भर घालून सोन्याचे दागिने केले जातात. ३०-३५-४० हजार असे करता करता सोन्याचे दर आता १.६० लाखांवर गेले आहे. त्यावर करणावळ, जीएसटी असा सगळा लवाजमा पाहता हे सोन्याचे दागिने तोळ्याला १.८० लाखांवर पडत आहेत. अशातच जर तुमच्या डोक्यात सोन्याचे दागिने विकून पैसे कमविण्याची कल्पना असेल तर खालील मुद्दे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
5 / 9
जर तुम्हाला लग्नसराईसाठी किंवा वैयक्तिक वापरासाठी दागिने खरेदी करायचे असतील, तर सध्याची वेळ वाईट नाही. कारण सोन्याचे दर हे वाढतच जाण्याची शक्यता जास्त आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता थोडे चढ उतार येतील असे तज्ञांचे मत आहे. यामुळे लग्नसराई असेल आणि जर तुमच्याकडे जुने सोने नसेल तर तुम्हाला लाखो रुपये मोजून अगदी चार-पाच तोळे सोनेतरी तुम्हाला घ्यावे लागणार आहे.
6 / 9
जर तुम्ही सोने विकायचे ठरवत असाल तर पुन्हा तुम्हाला कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेलच असे नाही. शिवाय आता जर २२ कॅरेट सोन्याची किंमत १.५२ लाख रुपयांच्या आसपास असेल तर तुम्हाला पूर्ण हिशेब घालावा लागेल. कारण जीएसटी आणि करनावळ आदी करांसह पकडली तर तुम्हाला भविष्यात खरेदी किंमत ही 1.52 लाखांच्या खालीच असावी लागणार आहे. म्हणजे त्यासाठी सोने हे १.१०-१.३० लाखांच्या आसपास यायला हवे. तरचे हे शक्य आहे. परंतू, हे सध्यातरी अशक्यच वाटत आहे.
7 / 9
हा एकप्रकारचा जुगारच आहे. जर तुमच्याकडे २०-३० हजार सोने असताना केलेल दागिने असतील तर तुम्ही ते २२ कॅरेटचे दागिने मोडून १८ कॅरेटचे करू शकता. असे केल्याने तुम्हाला आता आहेत त्यापेक्षा जास्त प्रकारचे आणि लेटेस्ट डिझाईनचे दागिने बनवून घेता येतील. यासाठी करणावळचा खर्च तुम्हाला खिशातून करावा लागेल किंवा जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या होत असलेल्या किंमतीतून वजा करून करता येईल. परंतू, यासाठी तुम्हाला आधी हिशेब घालावा लागेल. अनेक गृहीणींना नवीन डिझाईनचे दागिने हवे असतात, त्यांच्यासाठी हा पर्याय सोईचा ठरू शकतो.
8 / 9
जर तुम्ही दागिने तसेच ठेवले तर काय होईल, जसे सोने वाढेल तसे त्याची किंमतही वाढणार आहे. उद्या गरजेला, अडीअडचणीला ते उपयोगी येतील. परंतू, तुम्हाला काळजीही तितकीच घ्यावी लागणार आहे. हे सोने तुम्हाला खूपच जपून ठेवावे लागणार आहे.
9 / 9
कारण एक तोळा जरी गेला तरी आता १.७० लाख आणि भविष्यात माहिती नाही एवढे नुकसान एका झटक्यात होणार आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. यामुळे आता महिलांनी घराबाहेर पडताना देखील कमी दागिने घालूनच बाहेर पडावे, चोऱ्यामाऱ्या होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी बेंटेक्सचा पर्याय चांगला आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी