ताज महालसमोर इस्त्रायली पंतप्रधानांना 'या' फोटोचा मोह आवरता आला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 17:50 IST2018-01-16T17:37:56+5:302018-01-16T17:50:57+5:30

भारत दौ-यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी सपत्नीक प्रेमाचे प्रतीक असलेल्या जगप्रसिद्ध ताज महालला भेट दिली.

इतरांप्रमाणे बेंजामिन नेतन्याहू यांनाही ताज महालसमोर पत्नीचा हात हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

ताज महाल पाहण्यासाठी आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लखनऊ विमानतळावर विमानातून उतरताना.

इस्त्रायली पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ