शुभांगी स्वरूप बनल्या नौदलाच्या पहिल्या महिला पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:08 IST2017-11-23T17:05:32+5:302017-11-23T17:08:01+5:30

भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्यात आला आहे. शुभांगी स्वरूप असं या पहिल्या महिला पायलटचं नाव आहे.

शुभांगी स्वरूप यांच्याबरोबर आणखी तीन महिलांचाही नौदलात समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत.

नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५ मध्येच मंजुरी देण्यात आली होती. बुधवारी शुभांगी स्वरूप इंडियन नेव्हल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

शुभांगीसह आस्था सहगल, रूपा ए. आणि शक्तिमाया एस. यांचाही नौदलाच्या अर्मामेंट इन्स्पेक्शन ब्रँचमध्ये समावेश करण्यात आला आहे.