वंदे भारत स्लीपरची पहिली झलक; दोन महिन्यांपासून सुरू होती गुणवत्ता चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 18:41 IST2024-12-18T18:35:23+5:302024-12-18T18:41:41+5:30
Vande Bharat Sleeper Train photos: प्रति तास 160 किमी वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. या ट्रेनची पहिली चाचणी लवकरच होणार असून, २०२५ मध्ये प्रवाशांना या रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली आहे. रेल्वे कोच फॅक्ट्ररीतून रेल्वे बाहेर पडली असून, आता तिची चाचणी होणार आहे.
बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप आयसीएफ चेन्नईवरून आरडीएसओच्या चाचणी रवाना झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली.
नवी वंदे भारत स्लीपर ट्रेनची बांधणी बीईएमएल आणि इंटिग्रल कोच फॅक्ट्री (ICF) यांनी संयुक्तपणे केली आहे. मागील दोन महिन्यांपासून आयसीएफमध्ये गुणवत्ता आणि दर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू होती.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाईपचे फोटो शेअर करत याची माहिती दिली. चेन्नईच्या आयसीएफमधून ट्रेन चाचणीसाठी बाहेर पडल्याचे ते म्हणाले.