राजस्थानमध्ये साकारणार पहिला इको फ्रेंडली तेल रिफायनरी प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 22:32 IST2018-01-16T22:29:20+5:302018-01-16T22:32:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राजस्थानातील बारमेर जिल्ह्यातल्या पहिल्या इको फ्रेंडली तेल रिफायनरीचं उद्घाटन केलं.
मोदींसह यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेही उपस्थित होत्या. मोदींनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
राजस्थानमधल्या पंचपदरा येथे ही तेल रिफायनरी बनवली जात आहे. राजस्थानमधील नागरिकांना हा प्रकल्प सुरू कधी होतो याची उत्कंठा लागून राहिली आहे.
राजस्थान सरकार आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारणार आहे.
राजस्थानमधल्या बारमेर जिल्ह्यातील रिफायनरीवर जवळपास 43 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.