शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिले डॉक्टर, नंतर प्रशासकीय अधिकारी आणि आता काश्मीरी नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 5:52 PM

1 / 6
जम्मू काश्मीरमधील माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. शाह यांच्या पक्षाचे नाव जम्मू काश्मीर पिपल्स मूव्हमेंट असं आहे. त्यांचा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.
2 / 6
माजी आयएएस अधिकारी शाह फैसल हे राज्यातील कोणत्या तरी पक्षात सहभागी होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थी नेता शेहला रशीद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.
3 / 6
फैसल यांनी 2010 मध्ये आयएएस परिक्षेत टॉप केले होते. काश्मीरमधील ते पहिले युवक होते ज्यांनी युपीएससी परिक्षेत टॉप केले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला.
4 / 6
युपीएससी परिक्षा टॉप करण्याआधी शाह फैसल यांनी एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर फैसल यांनी प्रशासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि युपीएससी परिक्षा दिली.
5 / 6
अनेक वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर फैसल यांनी काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुसलमानांच्या हक्कासाठी जानेवारी महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. आयएएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त कारभार, स्वच्छ पारदर्शी प्रशासकीय धोरणांवर काम सुरु ठेवले.
6 / 6
याआधीही आयएएस शाह फैसल आपल्या कारकिर्दीत अनेक वक्तव्य आणि कामांसाठी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत. जम्मू काश्मीरच्या प्रत्येक घटनेवर ते भाष्य करत असतात. काश्मीरमधील बलात्काराच्या घटनेवर भाष्य करताना त्यांनी रेपिस्तान या शब्दाचा वापर केला. त्यावर अनेक वाद निर्माण झाले.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगdoctorडॉक्टर