शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Terrorist: आधी बशीर, मग रजा, नूर आणि आता पंजवार; परदेशात टिपून टिपून मारले जाताहेत भारतविरोधी दहशतवादी, गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 12:31 PM

1 / 7
पाकिस्तानमध्ये लपून दहशतवादी नेटवर्क चालवणारा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या परमजीत सिंह पंजवार याची शनिवारी लाहोरमध्ये हत्या करण्यात आली. पंजवार हा मॉर्निंग वॉकला गेला असताना दोन बंदुकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार करून त्याला ठार केले.
2 / 7
पंजवार हा परदेशात मारला गेलेला भारतातील एकमेव दहशतवादी नाही आहे. गेल्या काही काळात भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले गेले आहे. यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लपून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या काही दहशतवाद्यांचा समावेश आहे. यातील काही दहशतवादी पुढीलप्रमाणे.
3 / 7
२० फेब्रुवारी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील राहणार बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याची पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा लाँचिंग कमांडर असलेल्या बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज याला रावळपिंडी येथे गोळ्या झाडून ठार करण्यात आले. गतवर्षीच भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले होते.
4 / 7
दहशतवादाचं विद्यापीठ समजले जाणारा एजाज अहमद अहंगर याची २२ फेब्रुवारी २०२३ रोजी अफगाणिस्तानमधील काबूल येथे हत्या करण्यात आली. भारतामध्ये इस्लामिक स्टेट (आयएस) ला पुन्हा सुरू करण्यामध्ये गुंतलेला एजाज हा अल कायदाच्या संपर्कात होता. १९९६ मध्ये काश्मीरमधील तुरुंगातून सुटल्यावर एजाज पाकिस्तानात पळाला होता. तिथून तो अफगाणिस्तान पळाला होता. भारत सरकारवने त्याचा समावेश मोस्ट वॉटेड दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. अहंगरचा जन्म १९७४ मध्ये श्रीनगरमधील नवाकदल येथे झाला होता.
5 / 7
पाकिस्तानमध्ये अल बद्रचा माजी कमांडर सय्यद खालिद रजा याची २६ फेब्रुवारी रोजी सय्यद खालिद रजा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अल बद्र ही एक कट्टरवादी संघटना आहे. ती काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असते. सय्यद खालिद रजा याची कराचीमधील त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. रजा हा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात सक्रिय होता.
6 / 7
भारताच्या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये समावेश असलेल्या सय्यद नूर शालोबर याची पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा परिसरात ४ मार्च २०२३ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. शालोबार पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेशी मिळून काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम करत होता. तसेच नव्या दहशतवाद्यांच्या फौजेलाही प्रशिक्षण देत होता.
7 / 7
तर परमजित सिंग पंजवार याची शनिवार ६ मे रोजी पाकिस्तानमधील लाहोर येथे हत्या करण्यात आली. १९६० मध्ये पंजाबमधील तरनतारन येथील पंजवार गावात त्याचा जन्म झाला होता. १९८६ मध्ये चुलत भावाच्या हत्येनंतर तो खलिस्तान कमांडो फोर्समध्ये दाखल झाला होता. तत्पूर्वी तो केंद्रीय सहकारी बँकेमध्ये नोकरी करत होता. भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर १९९२ मध्ये तो पाकिस्तानमध्ये पळाला. तत्कालीन लष्कप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येमध्येही तो सहभागी होती.
टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndiaभारतPakistanपाकिस्तान