मतदानाच्या जनजागृतीसाठी त्याने बनवली सोन्या-चांदीने मढवलेली EVM
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:22 IST2019-04-04T19:09:22+5:302019-04-04T19:22:11+5:30

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील वातावरण राजकीय रंगात रंगले आहे. दरम्यान, मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तामिळनाडूमधील एका व्यक्तीने चक्क सोन्या-चांदीने मढवलेली EVM ची प्रतिकृती बनवली आहे.
या ईव्हीएमवर विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे चितारलेली आहेत. ईव्हीएमची ही प्रतिकृती बनवण्यासाठी सोने आणि चांदी वापरण्यात आली आहे.
राज असे या इव्हीएमची प्रतिकृती बनवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील रहिवासी आहे.
राज याने याआधीही काही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती तयार केलेल्या आहेत. वरील चित्रात दिसत असलेला कम्पास आणि त्यावर अडवलेल्या पेन्सिलवरील हात वर करून पाहत असलेली व्यक्ती मतदान करण्याचे आवाहन करत आहे.
दरम्यान, सोने आणि चांदीचा मुलामा देऊन तयार केलेले इव्हीएम घडवण्यासाठी 1 ग्रॅम चांदी आणि 300 मिलिग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे.