शेतक-यांचा राजधानीत कर्जमाफीसाठी एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 19:58 IST2018-03-13T19:58:45+5:302018-03-13T19:58:45+5:30

नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे.
देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे.
त्यामुळे सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी.
सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे.