By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 08:14 IST
1 / 8देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्कर सदैव सज्ज असले तरी सॅटेलाइटच्या मदतीने शत्रूच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवणे आता गरजेचे झाले आहे.2 / 8त्यामुळेच अनेक देश अवकाशात आपले उपग्रह सोडून आपल्या शत्रूवर करडी नजर ठेवत असतात. असाच एक उपग्रह भारताने रविवारी अवकाशात सोडला. ‘सिंधू नेत्र’ असे या उपग्रहाचे नाव आहे. त्याविषयी...3 / 8संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तरुण शास्त्रज्ञांचा उपग्रहाची निर्मिती करण्यात मोठा वाटा आहे. इस्रोने पीएसएलव्ही-सी५१ याच्या साहाय्याने तो अवकाशात स्थिर करण्यात आला.4 / 8‘सिंधू नेत्र’ दक्षिण चीन समुद्र, एडनचे आखात आणि आफ्रिकी किनारपट्ट्या, जिथे समुद्री चाचांचा उपद्रव असतो, या भागांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.5 / 8४,००० किमी अंतराच्या चीन सीमेवरही ‘सिंधू नेत्र’ करडी नजर ठेवणार आहे. त्यामुळे चीनच्या कुरापतींना चांगलाच फटका बसणार असून घुसखोरीला आळा घातला येणार आहे. 6 / 8 लडाखमध्ये चिनी लष्कराशी तणाव निर्माण झाल्याने ‘सिंधु नेत्र’ सारख्या समर्पित उपग्रहाची नितांत आवश्यकता भासू लागली होती. तसेच, पाकिस्तानी घुसखोरांचा बंदोबस्त करणे भाग आहे.7 / 8४ ते ६ समर्पित उपग्रहांची मागणी लष्करातर्फे करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात सीमा सुरक्षा दलाने हाय रेझोल्युशन सेन्सर्स आणि कॅमेरांची आवश्यकता स्पष्ट केली होती.8 / 8हा असा पहिला उपग्रह आहे की जो चीनला खेटून असलेल्या लडाख परिसरात तसेच पाकिस्तानलगतच्या सीमारेषांवरील गस्तीसाठी उपयुक्त ठरू शकेल.