शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विमान दुर्घटनांनंतर DGCA ला खडबडून जाग, कंपन्यांना निष्काळजीपणा भोवणार; नव्या नियमांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:50 IST

1 / 10
देशात विमान अपघात आणि इतर घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. बारामती येथे विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. त्यानंतर डिजीसीएवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
2 / 10
मंगळवारी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी DGCA ने चार्टर उड्डाणे, खाजगी जेट आणि हेलिकॉप्टर सेवा प्रदान करणाऱ्या नॉन-शेड्यूल ऑपरेटर्ससोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर DGCA ने कठोर नियम जारी केले आहेत.
3 / 10
DGCA नं म्हटलं आहे की, गेल्या १० वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीचा आढावा घेतला, त्यात मानक कार्यपद्धती योग्यरित्या पाळल्या गेल्या नाहीत. उड्डाण नियोजनात दुर्लक्ष आणि वैमानिक प्रशिक्षणात कमतरता या गोष्टी आढळून आल्या आहेत. या कारणांमुळेच चार्टर आणि खाजगी उड्डाणांचा धोका वाढला आहे. म्हणूनच आता सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही असं नियामकाने स्पष्ट केले.
4 / 10
डीजीसीएने हे बदल केले - DGCA स्पष्टपणे सांगितले की, आतापासून व्हिआयपी मूवमेंट असोत किंवा व्यावसायिक विमान असोत सर्व परिस्थितीत सुरक्षितता सर्वोपरी असेल. उड्डाणादरम्यान पायलट-इन-कमांडचा निर्णय अंतिम असेल. जर एखाद्या पायलटने खराब हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे उड्डाण वळवले किंवा रद्द केले तर त्याच्यावर कोणत्याही दबाव येणार नाही.
5 / 10
नवीन नियमांनुसार चार्टर आणि खाजगी उड्डाण चालकांना त्यांच्या वेबसाइटवर विमानाचे वय, देखभाल रेकॉर्ड आणि वैमानिकाचा अनुभव सार्वजनिकपणे करणे आवश्यक असेल. डीजीसीए सर्व नॉन-शेड्यूल ऑपरेटर्ससाठी सुरक्षा रँकिंग देखील जारी करेल ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सुरक्षा मानकांचे मूल्यांकन करता येईल.
6 / 10
...तर पायलटचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो - डीजीसीए कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, फ्लाइट डेटा आणि तांत्रिक नोंदींची यादृच्छिक तपासणी वाढवेल. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यासाठी केवळ पायलटवर नव्हे तर ऑपरेटरच्या व्यवस्थापनावर देखील जबाबदार केले जाईल
7 / 10
उड्डाण कर्तव्य वेळेची मर्यादा ओलांडल्यास किंवा सुरक्षा मानकांपेक्षा कमी लँडिंग करण्याचा प्रयत्न केल्यास पायलटचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. त्याशिवाय ऑपरेटरला दंड आणि परवाना रद्द होण्याचा धोका देखील असेल.
8 / 10
जुन्या विमानांच्या देखभालीवर आणि ज्यांच्या मालकी बदलली आहे त्यांच्यावर विशेष देखरेख केली जाईल. ज्या ऑपरेटरची स्वतःची देखभाल सुविधा आहे त्यांची देखील तपासणी केली जाईल. जर ते मानके पूर्ण करण्यात अयशस्वी झाले तर त्यांना मान्यताप्राप्त एजन्सीकडून देखभाल करणे आवश्यक असेल.
9 / 10
डीजीसीएच्या मते नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्सचे विशेष सुरक्षा ऑडिट दोन टप्प्यात केले जाईल. पहिला टप्पा मार्चच्या सुरुवातीला सुरू होईल आणि त्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल. संपूर्ण क्षेत्रातील सुरक्षा संस्कृती मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे.
10 / 10
बारामती विमान अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर रुग्णवाहिका विमानाचाही अपघात झाला. त्यात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवनहंस हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात उतरवण्यात आले. या सर्व घटनांमुळे हवाई वाहतुकीविषयी लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAjit Pawarअजित पवार