CoronaVirus News : दिल्लीत कोरोना संसर्गाचा कहर; जाणून घ्या, टॉप-१० राज्यांमधील परिस्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 12:57 PM2020-11-11T12:57:47+5:302020-11-11T13:26:48+5:30

नवी दिल्ली : सणासुदीच्या कालावधीत भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे.

दिल्ली आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाले आहे. एका दिवसात एकूण नवीन प्रकरणांची संख्या 7 हजार 830 इतकी झाली आहे. सणासुदीचा कालावधी आणि वाढत्या प्रदूषणामुळे कोरोना रुग्णांच्या दर 13.26 टक्क्यांवर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 4 लाख 94 हजार 657 रुग्ण सक्रिय आहेत. तर या आजारापासून बरे होणाऱ्यांची संख्या 80 लाख 13 हजार 783 आहे. देशात आतापर्यंत एकूण 86 लाख 36 हजार 012 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 44, 281 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे, तर 512 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 17,23,135 इतकी आहे. तर 3,277 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15,777, 322 झाली आहे आणि आतापर्यंत एकूण 46,249 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

कर्नाटकात आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 8,48,850 झाला आहे. तर मृतांची संख्या 11, 410 वर पोहोचली आहे.

आंध्र प्रदेशात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8,44,359 झाली आहे. तर मृतांचा आकडा 6,802 वर पोहोचला आहे.

तामिळनाडूत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 7,46,079 वर पोहोचली आहे. तर 11,362 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये आतापर्यंत 4,89,702 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात मृतांची संख्या 1,714 वर पोहोचली आहे.

दिल्लीत आतापर्यंत 4,51,382 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मृतांचा आकडा 7,143 वर पोहोचला आहे.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत 4,99,199 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या 7,231 वर पोहोचली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये कोरोनाचे आतापर्यंत 4 लाख 9 हजार 221 रुग्ण आढळले आहेत. तर मृतांची संख्या 7 हजार 350 झाली आहे.

ओडिसा राज्यात आतापर्यंत 3 लाख 2 हजार 793 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर 1 हजार 441लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

तेलंगणामध्ये 2 लाख 52 हजार 455 लोकांना कोरोनाची लागण झाली. तर कोरोनामुळे 1 हजार 385 जणांचा मृत्यू झाला.