Corona Vaccine : देशातील कोणत्या राज्यात कधी अन् केव्हा होणार कोरोना लसीकरण?; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 04:10 PM2021-01-18T16:10:31+5:302021-01-18T16:32:37+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

देश सध्या कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 1,05,71,773 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,788 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 145 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 1,52,419 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मोठ्या राज्यांत आठवड्यातील चार दिवस तर लोकसंख्या कमी असलेल्या लहान राज्यांत दोन दिवस लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले आहेत.

देशातील कोणत्या राज्यात कधी, कुठे, केव्हा कोरोना लसीकरण होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यांनी त्यांच्या सोयीनुसार लसीकरणाचे दिवस ठरवले आहेत. कोरोना लसीकरणाचे वेळापत्रक जाणून घेऊया.

केंद्राच्या निर्देशानुसार आसाम, बिहारसारख्या राज्यांनी आठवड्यातून चार दिवस कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये रविवार वगळता दररोज लसीकरण होईल.

चंदिगड, दिल्ली, छत्तीसगड यासारखी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत आठवड्यातून चार दिवस कोरोना लस दिली जाईल. गोवा एक लहान राज्य असल्याने तिथे फक्त शुक्रवारी आणि शनिवारी लसीकरण केले जाईल.

गुजरात, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, झारखंड येथे आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जाईल. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये फक्त सोमवार आणि मंगळवारी कोरोना लस दिली जाईल.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, मणिपूर येथे आठवड्यातून चार दिवस कोरोना लसीकरण होईल.

पंजाब, राजस्थान, सिक्कीम येथे चार दिवस कोरोना लस दिली जाईल. तसेच नागालँड आणि ओडिशामध्ये आठवड्यातून तीन दिवस लसीकरण केले जाणार आहे.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याने आठवड्यातून फक्त दोन दिवस लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा, उत्तराखंड येथे चार दिवस लसीकरण होणार आहे.

संपूर्ण देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम राबवली जात आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाविरोधातील लसीकरणाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असली तरी कोरोनाची लस आणि त्याच्या संभाव्य दुष्परिणामांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.