CoronaVirus Updates: देशात नव्या 9 हजार 283 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:03 IST2021-11-24T10:59:29+5:302021-11-24T11:03:32+5:30
देशात दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 283 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एक लाख 11 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात दिवसभरात 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या व्हायरसमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 66 हजार 584 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 35 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत स्थिरता दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 766 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 929 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,77,379 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे.
राज्यातील 85,335 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1077 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,493 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.