CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:03 PM2020-06-16T19:03:02+5:302020-06-16T19:34:33+5:30

या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.

डॉक्टरांना कोरोना विषाणूवरच्या उपचारांसाठी प्रभावी औषधाची माहिती मिळाली आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे. या औषधाच्या मदतीनं कोरोना विषाणूमुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांचे जीव वाचविण्यात यश आले आहे.

Dexamethasone असे या औषधाचे नाव आहे. यूके तज्ज्ञ म्हणतात की, हे एक मोठे यश आहे. डेक्सामेथासोन या औषधाचे डोस कोरोनाशी लढायला मदत करतात.

चाचणीदरम्यान असे आढळले की, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांना हे औषध दिल्यास मृत्यूचा धोका एक तृतीयांश कमी झाला आहे.

ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना या औषधाचा अधिक फायदा होतो. ज्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे, अशा रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो.

पण या औषधाचा वापर करून हा धोका कमी करता येऊ शकतो. जगातील सर्वात मोठ्या चाचण्यांमध्येही डेक्सामेथासोन औषधाचा समावेश करण्यात आलेला आहे.

संशोधकांचा असा अंदाज आहे की, जर आधी हे औषध ब्रिटनमध्ये उपलब्ध असते तर कोरोनापासून 5000 लोक वाचू शकले असते, कारण हे औषध देखील स्वस्त आहे.

कोरोना विषाणूच्या 20 रुग्णांना डेक्सामेथासोन औषध देण्यात आले. यापैकी 19 जणांना रुग्णालयात येण्याची गरजच लागली नाही. आणि ते घरीच बरे झाले. त्याचबरोबर रुग्णालयात दाखल झालेल्या अतिजोखमीच्या रुग्णांनाही याचा फायदा झाला.

इतर अनेक रोगांसाठी हे औषध आधीच जळजळ कमी करण्यासाठी वापरले जाते. चाचणीदरम्यान ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या पथकाने रुग्णालयात दाखल केलेल्या सुमारे 2000 रुग्णांना हे औषध दिले.

या रुग्णांची तुलना इतर 4000 रुग्णांशी केली गेली, ज्यांना हे औषध देण्यात आले नव्हते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांमध्ये देखील या औषधाचा चांगला परिणाम जाणवला.

त्यांच्या मृत्यूचा धोका 40 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत घसरला. या औषधामुळे ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता 25 टक्क्यांवरून घसरून 20 टक्क्यांपर्यंत आली आहे.

मुख्य तपासनीस प्रा. पीटर हॉर्बी म्हणाले की, आतापर्यंत हे एकमेव औषध आहे जे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. हे एक मोठे यश असल्याचंही ते म्हणाले आहेत.