शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: ...तर पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग, एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांनी व्यक्त केली भीती

By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 2:43 PM

1 / 5
जगभरात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाची अजून एक लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे कोविड-१९ च्या नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण देशातील विविध भागात सापडत आहेत.
2 / 5
अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा आधी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही पुन्हा एकदा बाधित करू शकतो. असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.
3 / 5
गुलेरिया यांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये आधीपासून कोरोनाविरोधातील अँटीबॉडी आहेत त्यांनासुद्धा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनावरील लस हाच कोरोनापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.
4 / 5
हर्ड इम्युनिटीबाबत डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, हर्ड इम्युनिटीबाबत लोकांनी आपला विचार बदलला पाहिजे. चिंतेची बाब म्हणजे पूर्णपणे हर्ड इम्युनिटी मिळवणे शक्य नाही. भारतासारख्या देशात हर्ड इम्युनिटीचा विचार करणे कठीण आहे. भारता हर्ड इम्युनिटीबाबत विचार करणे हे मिथक आहे. त्यासाठी ८० टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित होणे गरजेचे असेल.
5 / 5
दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट देशातील काही राज्यांत वेगाने पसरत आहे. जगभरात सापडलेल्या कोरोना विषाणूचा भारतात कमी प्रभाव दिसून येत आहे. मात्र विषाणूचे पुरेशा प्रमाणात सिक्वेंसिंग न होणे हे त्याचे कारण असू शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य