Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठं यश; व्हायरसला हरवण्यासाठी तयार केली लस!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:40 AM2020-04-04T09:40:56+5:302020-04-04T09:44:36+5:30

देशात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत आहेत. पण कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी लसदेखील देशात तयार केली जात आहे. ज्यामुळे देशातील जनतेला या भयानक आजारापासून वाचवता येईल. या लसीची खास गोष्ट म्हणजे ते आपल्या शरीरात इंजेक्शनद्वारे देणार नाहीत किंवा पोलिओ ड्रॉपसारखे प्यावे लागणार नाही.

हैदराबादमधील भारत बायोटेकने कोरोफ्लू नावाची लस विकसित केली आहे. कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी तयार केलेली ही लस सिरिंजद्वारे शरीरात घातली जाणार नाही. या लसीचा एक थेंब पीडित व्यक्तीच्या नाकात टाकण्यात येईल.

कोरोफ्लू: वन ड्रॉप कोविड - 19 नाकाची लस असं या लसीचे पूर्ण नाव आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे. कारण यापूर्वीही कंपनीने फ्लूसाठी बनविलेले ही औषधे सुरक्षित होती.

भारत बायोटेकने यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन आणि फ्लुजेन कंपनीशी करार केला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे ही लस विकसित केली आहे.

कोरोफ्लू जगातील प्रसिद्ध फ्लूचं औषध एम2एसआर च्या आधारे तयार केलं जात आहे. हे योशिहिरो कावाओका आणि गॅब्रिएल न्यूमन यांनी तयार केले होते. इन्फ्लूएन्झा रोगासाठी एम 2 एसआर एक शक्तिशाली औषध आहे.

जेव्हा हे औषध शरीरात प्रवेश करते तेव्हा शरीरात फ्लूविरूद्ध लढण्यासाठी त्वरित अँटीबॉडीज तयार करते. यावेळी योशिहिरो कावाओकाने एम2आर एसआर औषधात कोरोना विषाणू कोविड १९चा जनुक क्रम मिसळला आहे.

एम2एसआर बेसवर तयार झालेल्या कोरोफ्लू औषधामध्ये कोविड १९ चा जनुक क्रम समाविष्ट केल्याने हे औषध आता कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी तयार आहे. म्हणजेच जेव्हा ही लस आपल्या शरीरात टाकली जाईल तेव्हा आपल्या शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज तयार होतील.

कोरोफ्लूमुळे अँटीबॉडीज आपल्या शरीराला कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यात मदत करतील. भारत बायोटेकचे बिझिनेस डेव्हलपमेंटचे हेड डॉ. रैशेल एला यांनी सांगितले की आम्ही ही लस भारतात तयार करु. त्यानंतर याची चाचणी करण्यात येईल. मग याठिकाणाहून ३० कोटी औषधं बनवण्यात येईल.

या लसीची क्लिनिकल चाचण्या अद्याप बाकी आहेत. कंपनी २०२० च्या अखेरीस मानवांवर क्लिनिकल चाचण्या घेण्यास सुरुवात करेल. तोपर्यंत विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत त्या चाचण्या सुरू राहतील

एम2एसआर हा फ्लूचा व्हायरस आहे. ज्यामध्ये एम 2 जनुक नाही. यामुळे कोणताही विषाणू शरीरातील पेशी तोडून नवीन व्हायरस तयार करू शकत नाही. म्हणूनच या औषधाचा प्रयोग खूप यशस्वी मानला जात आहे.