शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: युरोपात कोरोनाचा हाहाकार, अनेक देशांत लॉकडाऊन; भारत सतर्क, निर्बंध पुन्हा लागू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 8:48 PM

1 / 10
कोरोना महामारीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. युरोपातील अनेक देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हॉटेल्स बंद आहेत. बाजारपेठा बंद आहेत. क्रिसमसच्या उत्सवावर लॉकडाऊनचं संकट उभं राहिलं आहे.
2 / 10
पीटीआयनुसार, युरोपातील देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी काही भागात पूर्ण लॉकडाऊन तर काही ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ऑस्ट्रियाची राजधानी वियाना येथे बार बंद आहेत. दुसरीकडे जर्मनी इथं क्रिसमस बाजार ओसाड पडले आहेत.
3 / 10
ब्रिटनची राजधानी लंडन येथे अपेक्षेपेक्षा परिस्थिती चांगली आहे. युरोपात वाढणाऱ्या निर्बंधामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत तिनदा राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आला आहे. युरोपात ब्रिटनमध्ये जवळपास १,४५,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 / 10
नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चेक गणराज्यसह अनेक देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटलमध्ये संघर्षमय परिस्थिती दिसून येत आहे. वाढता प्रसार लक्षात घेता देशात लॉकडाऊन आणि निर्बंध यासारखे प्रयोग लागू करण्यात आले आहेत.
5 / 10
कोरोना व्हायरसचा नवा डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमणात वेगाने वाढ होताना दिसत आहे. गरमीमुळे ब्रिटनलाही या संकटाचा सामना करावा लागू शकतो असं पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितले आहे. यूरोपातील कोरोना लाटेमुळे क्रिसमसच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट आहे.
6 / 10
भारताच्या ताजे आकडेवारीनुसार, देशात २६ नोव्हेंबर संध्याकाळपर्यंत १.१० लाख कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील ९ हजार रुग्ण गंभीर आहेत. ब्रिटन, रशिया, अमेरिका, जर्मनी यांच्या तुलनेत भारतात कोरोना संक्रमणाचा वेग कमी आहे. देशात लसीकरणाचा वेग जास्त आहे.
7 / 10
आतापर्यंत ७० कोटीहून अधिक जनतेने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर २६ कोटी जनतेचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. देशाच्या लोकसंख्येचा एक भाग लसीकरण झालेला आहे. त्यामुळे चिंतेची गोष्ट नाही. तरीही तज्ज्ञांकडून कोविड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याचं आवाहन केले जात आहे.
8 / 10
भारत सरकारने सध्या लॉकडाऊन, निर्बंध असा कुठलाही निर्णय घेतला नाही किंवा कोणतीही गाईडलाईन्स जारी केली नाही. सरकारने आजच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.
9 / 10
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटनंतर गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
10 / 10
सतत रुप बदलण्यामुळे WHO सोबतच शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणे ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुस-या लहरीमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असेच उत्परिवर्तन झाले आणि ते घातक ठरले. सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्याची लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जात आहे. यास वेळ लागू शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या