शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:08 AM

1 / 15
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांवर वर पोहोचली आहे. तर 3500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 15
विविध मार्गाचा वापर करून लोक आपल्या गावी जात आहेत. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे.
4 / 15
अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.
5 / 15
तब्बल 18 वर्षांनंतर एक व्यक्ती मुंबईहून आपल्या गावी परतली पण तोपर्यंत कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले होते.
6 / 15
उत्तर प्रदेशातील कैथवलियामध्ये ही घटना घडली. महंगी प्रसाद असं या व्यक्तीचं नाव असून साधारण 18 वर्षांपूर्वी त्यांनी रागाने घर सोडलं होतं. कामाच्या शोधात ते मुंबईला गेले होते.
7 / 15
लॉकडाऊनमध्ये प्रसाद आपल्या गावी परतले मात्र त्यावेळी त्यांच्या आईचं आणि पत्नीचं निधन झालं होतं. कारण 18 वर्षांत खूप काही घडलं होतं. बऱ्याच गोष्टी या बदलल्या होत्या .
8 / 15
कैथवलिया गावचा रहिवासी असलेले महंगी प्रसाद यांचं 18 वर्षांपूर्वी पत्नीसोबत भांडण झालं. रागाच्या भरात ते घर सोडून गेले.
9 / 15
प्रसाद त्यावेळी अंदाजे 40 वर्षांचे होते आणि त्यांचे लग्नही झाले होते. त्यांना एक मुलगीही होती.
10 / 15
घरात झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ते घर सोडून गेले आणि आता तब्बल 18 वर्षांनंतर गावात परतले. 18 वर्षांपूर्वी आई, पत्नी आणि मुलींना घरी ठेवून मुंबई गाठली.
11 / 15
एका छोट्या कारखान्यात ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागले. गेल्या 18 वर्षांमध्ये गाव आणि घराची आठवण नाही आली.
12 / 15
गावातील लोकांनी प्रसाद यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजून त्यांची घरी परत येण्याची अपेक्षाही कुटुंबीयांनी सोडून दिली.
13 / 15
लॉकडाऊन जवळ असलेले पैसे संपले आणि प्रसाद यांना घरची आठवण येऊ लागली म्हणून त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.
14 / 15
3500 रुपयांचे भाडे देऊन प्रसाद अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे पोहोचले. तिथून त्यांनी आपल्या घरापर्यंत पायी प्रवास केला. गावी त्यांना त्यांच्या मुली भेटल्या.
15 / 15
आपले वडील जिवंत आहेत हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आता प्रसाद यांनी मुली आणि जावयासोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशMumbaiमुंबईDeathमृत्यूIndiaभारत