शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 3:16 PM

1 / 14
देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 43,70,129 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 73,890 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 89,706 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,115 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत.
3 / 14
भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होत असल्याची माहिती समोर आली होती.
4 / 14
कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला . तसेच यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर कमी झाला असल्याचं देखील म्हटलं होतं. मात्र आता प्लाझ्मा थेरपीबाबत महत्त्वाची माहिती मिळत आहे.
5 / 14
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नसल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून अशी माहिती समोर आली आहे.
6 / 14
14 राज्यांच्या 39 रुग्णालयातील 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्यानंतर आयसीएमआरच्या संशोधकांनी असं म्हटलं आहे. रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
7 / 14
एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचं रिसर्चमध्ये स्पष्ट केलं आहे.
8 / 14
संशोधनानुसार प्लाझ्मा थेरपीचा थोडा वापर नक्कीच दिसून आला. श्वासोच्छवास घेताना समस्या किंवा थकवा कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला.
9 / 14
ताप किंवा खोकला यासारख्या लक्षणांवर मात्र प्लाझ्मा थेरपीचा वापर होऊ शकला नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 14
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात असल्याने प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
11 / 14
कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील 800 मिली रक्त घेतलं जातं.
12 / 14
रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.
13 / 14
जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात.
14 / 14
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतResearchसंशोधन