शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bharat Biotech च्या Covaxin ला मंजुरी मिळण्यात का होतोय उशिर?; WHO नं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 8:38 AM

1 / 12
देशभरात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. तसंच मृत्यूदरही कमी होताना दिसत आहे.
2 / 12
देशव्यापी कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. यातच कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या Covaxin लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) हिरवा कंदील मिळालेला नाही. येत्या २६ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं सांगितलं जात आहे.
3 / 12
भारतात भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन (Covaxin) या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र (World Health Oranization) या लसीच्या आपात्कालिन वापरास अद्यापही मंजुरी दिलेली नाही.
4 / 12
याच दरम्यान, या लसीच्या मंजुरीसाठी होत असलेल्या विलंबावरून WHO चं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. WHO च्या म्हणण्यानुसार भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनबाबत अद्यापगी अधिक माहिती गरज आहे. जेणेकरून लसीच्या आपात्कालिन वापरापूर्वी (Emergency Use) त्याचं योग्यरित्या मूल्यांकन केलं जाऊ शकेल.
5 / 12
भारत बायोटेक दीर्घ कालावधीपासून Covaxin ला WHO कडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. भारत बायोटेकनं १९ एप्रिल रोजी कोवॅक्सिनशी निगडीत डेटा WHO कडे सोपवला होता.
6 / 12
WHO कोवॅक्सिनला मंजुरी देण्यात उशिर का होत आहे यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा अनेक जण करत आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या आपात्कालिन वापरापूर्वी आम्हाला ती सुरक्षित आणि प्रभावी आहे का नागी याचं मूल्यांकन करावं लागतं, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
7 / 12
कोवॅक्सिनबाबत भारत बायोटेक सातत्यानं डेटा पुरवत आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. दरम्यान, WHO अधिक डेटाची अपेक्षा करत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
8 / 12
भारतात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची Covishield, भारत बायोटेकची Covaxin, रशियाची स्पुटनिक व्ही. तसंच एक डोस पुरेशी असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
9 / 12
भारताखेरीज अन्य देशांमध्ये कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढील बैठकीकडे भारताचं लक्ष लागले आहे.
10 / 12
WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्लागारांची एक महत्त्वाची बैठक २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीत Covaxin कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन मंजुरीबाबत विचार केला जाऊ शकतो. WHO ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारत बायोटेकसोबत काम सुरू असल्याचं स्वामीनाथन यांनी सांगितलं.
11 / 12
तसेच आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा व्यापक पोर्टफोलियो आणि शक्य त्या सर्व ठिकाणी त्याची उपलब्धता करून विस्तार करणं, हेच WHO चे मुख्य लक्ष्य असल्याचं स्वामीनाथन यांनी नमूद केलं.
12 / 12
भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ वायरोलॉजी यांच्यासोबर Covaxin कोरोना लसीची निर्मिती केली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना