Corona Vaccine : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लसीचा फक्त एकच डोस पुरेसा?; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:38 PM2021-05-04T16:38:54+5:302021-05-04T16:48:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : सर्वच देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. याच दरम्यान संशोधनातून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून तेथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. सर्वच देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरू आहे. याच दरम्यान संशोधनातून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे

कोरोना विषाणूविरोधात अँटीबॉडी तयार करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचं म्हटलं जातं. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून एक नवीन माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसवर मात दिलेल्या व्यक्तींना लसीचा फक्त एकच डोस पुरेसा आहे. लसीच्या एकाच डोसमुळे त्यांच्या शरिरात पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होते असं म्हटलं आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे.

लंडनमधील इम्पिरिअल कॉलेज, क्वीन मेरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. एका सायन्स जर्नमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यामध्ये लसीच्या डोस संदर्भात दावा करण्यात आला आहे.

कोरोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींमध्ये लसीच्या एका डोसमुळे शरिरात आवश्यक तेवढ्या अँटीबॉडीज विकसित झाल्याचा दावा त्यांनी केला. शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या दक्षिण आफ्रिका व्हेरिएंटवर हे संशोधन केले होते.

संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी फायजर-बायोएनटेकच्या लसीचा वापर केला. ज्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यामध्ये कोरोनाची कमी लक्षणे होती. काही जणांमध्ये ही लक्षणेही नव्हती.

इम्पिरिअल कॉलेजचे प्राध्यापक रोसमेरी बॉयटन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती अशा व्यक्तींना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान भारताला जगातील इतर देशांनी मदतीचा हात दिला आहे. ब्रिटनकडूनही भारताला वैद्यकीय उपकरणे, सामग्री पाठवण्यात येत आहे.

ब्रिटनकडून भारताला ऑक्सिजन फॅक्टरी पाठवण्यात येणार आहे. यामुळे प्रति मिनिटाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करता येणे शक्य होणार आहे. उत्तर आयर्लंडमधून हे तीन 'ऑक्सिजन उत्पादक' पाठवण्यात येणार आहे.

प्रति मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजन निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी 50 जणांना ऑक्सिजन देता येणे शक्य होणार आहे. एका शिपिंग कंटेनरच्या आकारातील छोटे ऑक्सिजन कारखाने भारतातील रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मागणीला काही प्रमाणात पूर्ण करू शकतील.

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत.

कोरोनासारखं महाभयंकर संकट अजूनही संपलेलं नाही. हेच संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनकडून भारताला 495 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, 120 नॉन-इनव्हेजिव व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्यूअल व्हेंटिलेटर पाठवण्यात आले आहेत.