शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: दुर्दैवी! कोरोना बाधितानं रुग्णवाहिकेत प्राण सोडला अन् धक्कादायक प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 3:02 PM

1 / 9
देशातील कोरोना बाधितांचा आकडा साडे सतरा लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या दररोज देशात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
2 / 9
देशात आतापर्यंत कोरोनामुळे ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका बाजूला कोरोना रुग्ण जीव गमावत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत.
3 / 9
बिहारच्या सुपौलमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना कोरोना बाधितानं प्राण सोडला.
4 / 9
सुपौल जिल्ह्यातल्या त्रिवेणीगंजमध्ये कोरोना रुग्ण आढळून आला. त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यामुळे त्याला जिल्ह्यातल्या कोविड रुग्णालयात घेऊन आणण्यासाठी रुग्णवाहिका गेली होती.
5 / 9
रुग्णवाहिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत ठेवलं. मात्र रुग्णालयात नेलं जात असताना रुग्णाचा मृत्यू झाला.
6 / 9
कोरोना रुग्णाच्या मृत्यूमुळे रुग्णवाहिकेतील कर्मचारी घाबरले आणि ते रुग्णवाहिका तिथेच टाकून पळून गेले.
7 / 9
कोरोना रुग्णाला छातापूर पीएचसीमधून जिल्ह्यातील कोविड सेंटरला आणत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. पी. सिन्हा यांनी दिली.
8 / 9
रुग्णाच्या मृत्यूनंतर आरोग्य कर्मचारी त्याला तिथेच टाकून पळाले. त्यावेळी त्याची पत्नी रुग्णवाहिकेतच बसून होती. तिच्यावर आणखी कोणीही नव्हतं.
9 / 9
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कित्येक तास परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. कोरोना संकट काळात माणुसकीचं नातं संपत असल्याचं अशा अनेक घटनांमधून दिसत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या