coronavirus: संचारबंदीमध्ये गुटखा खरेदीसाठी शौकिनांचा जमाव जमला, पोलिसांनी लाठ्यांचा प्रसाद दिला, व्हिडीओही व्हायरल झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 01:53 PM2021-04-17T13:53:26+5:302021-04-17T13:59:05+5:30

coronavirus News : देशात कोरोनाचा फैलाव वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी, जमावबंदीसारखे नियम लागू करण्यात आले आहे. मात्र विविध कारणांमुळे या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

देशात कोरोनाचा फैलाव वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी, जमावबंदीसारखे नियम लागू करण्यात आले आहे. मात्र विविध कारणांमुळे या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.

मध्य प्रदेशमधील शिवपुरीमध्ये अशीच एक घटना घडली. येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवसांच्या लॉकडाऊनसारख्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र इथे असेही काही लोक आहेत ज्यांना या संचारबंदीमुळे काहीही फरक पडलेला नाही. पाच दिवसांच्या या संचारबंदीच्या काळात काही शौकिनांनी सोशल डिस्टंसिंगच्या कुठल्याही नियमांकडे लक्ष न देता गुटख्यासाठी रांगा लावून गर्दी केली. तेव्हा पोलिसांनी या शौकिनांना लाठ्यांचा प्रसाद दिला.

ही घटना शिवपुरीमधील शंकर कॉलनीमध्ये घडली आहे. तिथे एका किराणा दुकानासमोर गुटखा खरेदीसाठी मोठी रांग लागली होती.

ही रांग पाहून एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस येत असल्याचे पाहून हे लोक थेट दुकानामध्येच घुसले. त्यानंतर पोलिसांनी दुकानामध्ये घुसून त्यांना बाहेर काढले.

पोलिसांनी दुकानाचे शटर उघडून आधी सर्वसामान्यांना बाहेर काढले. त्यानंतर या सर्व गुटखा शौकिनांना लाठ्यांचा प्रसाद दिला.

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एकीकडे गुटखा खरेदीसाठी लोकांची रांग लागलेली दिसत आहे. तर दुसरीकडे पोलीस अशा लोकांची पिटाई करताना दिसत आहे.