CoronaVirus : १५ ऑगस्टआधीच कोरोनापासून 'स्वातंत्र्य' मिळणार; 'भारत' अन् ICMR लस आणणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 09:24 AM2020-07-03T09:24:44+5:302020-07-03T12:18:14+5:30

भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला असून, भारतालाही याचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाला थोपवण्याचं कसं, हा प्रश्न पडला आहे.

त्यातच वैज्ञानिक आपापल्या परीनं कोरोनावर लस तयार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. भारतात कोरोनावरची पहिली लस तयार करण्यात आली असून, जुलैमध्ये तिची क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

कोरोनावरची ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. पण आता ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात कोव्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस आहे.

कोरोनाच्या उपचारांसाठी नवंनवी औषधे बाजारात येत आहेत, पण आयुष मंत्रालयानं अशा औषधांना परवानगी दिलेली नाही.

विशेष म्हणजे या औषधांनी कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा संबंधित कंपन्यांकडून दावा केला जात आहे.

पण देशात पहिलीच तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिनची लस कोरोनापासून लोकांना वाचवू शकते, अशीही आशा व्यक्त केली जात आहे.

ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतीय बाजारात उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी या लसीला परवानगी मिळाली आहे.

कोरोनावर लस बनवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. पण त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी कोव्हॅक्सिनला परवानगी मिळाली आहे.